जय महाराष्ट्र प्रतिष्ठानने दिला ठिय्या आंदोलनाचा इशारा

चंद्रकांत देवकते
बुधवार, 30 मे 2018

मोहोळ (सोलापूर) : मोहोळ येथील कन्याप्रशाला चौकात गेल्या दहा वर्षांमध्ये सातत्याने होत असलेले अपघाताची अखंडीत मालिका थांबवण्यासाठी या ठिकाणी भुयारी मार्ग करावा! या मागणीसाठी जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्यावतीने वतीने मोहोळ तहसीलदार व पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले. या मागणीचा सकारात्मक विचार न झाल्यास 20 जून रोजी त्याच ठिकाणी रास्ता रोको करून आंदोलनाचा इशाराही या निवेदनाद्वारे दिला आहे.                                                   

महामार्ग सुरू झाल्यापासून या चौकामध्ये व परिसरामध्ये तब्बल  74 अपघात घडले आहेत. अपघातांची मालिका सुरू असुन त्यामध्ये 31 जणांचा बळी गेला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या चौकामध्ये सातत्याने विद्यार्थ्यांची नागरिकांची ये-जा असते. अनेक आंदोलने, निवेदने देऊनही या  ठिकाणी अधिकाऱ्यांच्या व राज्यकर्त्यांच्या या गंभीर प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याच्या मानसिकतेमुळे भुयारी मार्ग होत नाही. 

आजपर्यंत झालेल्या अपघात प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा व सदर ठिकाणी भुयारी मार्गाचे काम तात्काळ चालू करावे .या मागण्यासाठी मोहोळ येथील जय महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने 20 जून रोजी कन्या प्रशाला चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक, मोहोळ तहसीलदार, मोहोळ पोलीस निरीक्षक यांना देण्यात आल्या आहेत. यावेळी जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्रम देशमुख, सर्फराज सय्यद, उदय गायकवाड, किरण पोपळकर, उमेश कुंभार, पप्पु चौधरी, शाहू बरकडे, विश्वजीत यादव, नाना भोसले, पिंटू शेगर, अमीर शेख, विकास वाघमोडे, तुकाराम होनमाने, अजीज इनामदार, महेश देशमुख, जयपाल पवार आदींसह जय महाराष्ट्र प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: hint of agitation by jay maharashtra pratishthan