बेकायदा गर्भपात प्रकरणः विट्यातील दलाल डॉक्‍टर अटकेत

बेकायदा गर्भपात प्रकरणः विट्यातील दलाल डॉक्‍टर अटकेत

सांगली - गणेशनगर येथील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणी विटा (ता. खानापूर) येथील डॉ. अभिजित पोपटराव महाडिक (वय ३०, रा. शाहूनगर) याला पोलिसांनी अटक केली. गर्भपातासाठी रुग्णांना डॉ. रूपाली चौगुलेकडे पाठवत असल्याने ही कारवाई केली. तसेच गर्भलिंगनिदान केलेल्या रुग्णांना चौगुले हॉस्पिटलमध्ये पाठवल्याचा संशयही त्याच्यावर आहे.

चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपाताचा अड्डा उघडकीस आल्यानंतर मुख्य संशयित डॉ. रूपाली, तिचा पती विजयकुमार चौगुले, औषध विक्रेत्यास सुजित  दिलीप कुंभार या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे. तसेच हॉस्पिटलमधून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे गर्भपात केलेल्या माहिलांची चौकशी करण्यात आली. त्यातून विट्यातील डॉ. महाडिक याचे नाव पुढे आहे. गर्भपातासाठी तो चौगुले हॉस्पिटलचा पत्ता देत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 
दरम्यान, या प्रकरणातील डॉ. स्वप्नील जमदाडे अद्यापही पसार आहे. आठ दिवसांपासून तो पोलिसांच्या हाती लागलेला नाही.

डॉ. महाडिक कोण..?
डॉ. महाडिक हा मूळचा निवरी (ता. कडेगाव) येथील आहे. दीड वर्षापूर्वी त्याने सांगली-विटा रस्त्यावर  महाडिक हॉस्पिटल सुरू केले. तो ‘एमएस’ (स्त्रीरोग तज्ज्ञ) आहे. त्याच्याकडून मोठी माहिती हाती लागण्याची शक्‍यता आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com