बेकायदा गर्भपात प्रकरणः नांदणीतील एजंट ताब्यात

बेकायदा गर्भपात प्रकरणः नांदणीतील एजंट ताब्यात

सांगली - गणेशनगर येथील चौगुले हॉस्पिटलमधील बेकायदा गर्भपात प्रकरणी दलाल डॉक्‍टर अभिजित महाडिक याला अटक केल्यानंतर रात्री उशिरा नांदणी (ता. शिरोळ) येथील एका एजंटास पोलिसांनी ताब्यात घेतले. तो रुग्णवाहिका चालक असून त्याची चौकशी केली जात आहे.

दरम्यान, पोलिसांचा तपास आता गतीने सुरू असून गर्भपातांची संख्या पंचवीसवर पोहोचली आहे. याप्रकरणी सांगली-कोल्हापूरमधील डॉक्‍टर पोलिसांच्या रडारवर आहेत. 

चौगुले हॉस्पिटलमध्ये बेकायदा गर्भपाताचा अड्डा उघडकीस आल्यानंतर मुख्य संशयित डॉ. रूपाली, तिचा पती विजयकुमार चौगुले, औषध विक्रेत्यास सुजित  दिलीप कुंभार या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे. तसेच हॉस्पिटलमधून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे गर्भपात केलेल्या माहिलांची चौकशी करण्यात आली. त्यातून विट्यातील डॉ. महाडिक याचे नाव पुढे आहे. गर्भपातासाठी तो चौगुले हॉस्पिटलचा पत्ता देत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्यानंतर रात्री उशिरा नांदणीतील एका एजंटास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तो एजंट चौगुले हॉस्पिटलमध्ये गर्भपातासाठी रुग्णांना पाठवत असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. त्याची चौकशी पोलिसांकडून केली जात  असल्याची माहिती उपाधीक्षक अशोक वीरकर यांनी  दिली. 

१०८ चा चालक
पोलिसांनी ताब्यात घेतलेला हा एजंट १०८ च्या रुग्णवाहिकेवर चालक असल्याची माहिती समोर येत  आहे. शासकीय सेवेत असून तो चौगुले हॉस्पिटलसाठी काम करत होता.

डॉ. जमदाडेचा अटकपूर्व फेटाळला
प्रकरणातील मुख्य संशयित डॉ. रूपाली चौगुले हिचा भाऊ डॉ. स्वप्नील जगवीर जमदाडे पसार आहे. त्याने काल अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी फेटाळला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com