मिळकतकराची थकबाकी पोचली २३३ कोटींवर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

सोलापूर - नोटाबंदीच्या निर्णयानंतर महापालिकेच्या विविध करांची वसुली २० कोटी रुपयांपर्यंत गेली असली तरी, केवळ मिळकतकराची थकबाकी मात्र अजूनही २३३ कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये १३९ कोटी रुपये गावठाण भागात, तर ९४ कोटी रुपये हद्दवाढ भागात थकबाकी आहे. 

सोलापूर - नोटाबंदीच्या निर्णयानंतर महापालिकेच्या विविध करांची वसुली २० कोटी रुपयांपर्यंत गेली असली तरी, केवळ मिळकतकराची थकबाकी मात्र अजूनही २३३ कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये १३९ कोटी रुपये गावठाण भागात, तर ९४ कोटी रुपये हद्दवाढ भागात थकबाकी आहे. 

गावठाण भागात ३२ पेठांमध्ये ९३ हजार ७७८ मिळकतींची नोंद आहे. हद्दवाढ भागात १३ विभागांत एक लाख १९ हजार ६८६ मिळकती आहेत. या मिळकतींची थकबाकी मोठी आहे. नुकताच विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांचा सोलापूर दौरा झाला होता. त्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत ही थकबाकी तातडीने वसूल करण्याची सूचना त्यांनी केली होती. त्यानुसार ही थकबाकी वसूल करण्यासाठी महापालिकेमार्फत विशेष नियोजन केले जाणार आहे.

शास्ती व वाॅरंट फीची थकबाकीही कोटींमध्ये आहे. शहरात ही रक्कम अनुक्रमे दोन कोटी ६१ लाख आणि तीन कोटी ६४ लाख रुपये आहे. हद्दवाढ विभागात ही रक्कम ११ कोटी ११ लाख ६३ हजार ६४८ रुपये आणि एक कोटी ६८ लाख ९८ हजार ४४८ रुपये इतकी आहे. मिळकतकराचे बिल दिल्यानंतर १५ दिवसांत ते भरल्यास पाच टक्के सवलत मिळते, दिलेली मुदत संपल्यानंतर मात्र एक टक्का दंडाची कारवाई सुरू होती. ही दंडाची रक्कम वाढत चालली असल्याचे दिसून येत आहे. 

थकबाकी वसूल होण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध योजनाही राबविल्या जातात. वाॅरंट, नोटीस फी माफ करणे, अर्धा टक्का दंड घेणे आदी सवलती दिल्या जातात. मात्र, त्याचाही फायदा बहुतांश मिळकतदार घेत नसल्याचे दिसून आले आहे. शासकीय कार्यालयाकडेही मोठी थकबाकी आहे. ती वसूल करण्यासाठीही महापालिकेने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे मत जाणकारांतून व्यक्त केले जाते. 

‘सर्जिकल स्ट्राइक’ मोहिमेत आठ कोटींची वसुली
नोटाबंदीच्या कालावधीत शासनाने वेळोवेळी दिलेल्या मुदतवाढीच्या कालावधीत २१ नोव्हेंबरअखेर आठ कोटी सहा लाख २५ हजार ८४८ रुपयांची वसुली झाली. त्यामध्ये शहर भागातून चार कोटी ५७ लाख ३५ हजार ७०६ रुपये, तर हद्दवाढ भागातून तीन कोटी ४८ लाख ९० हजार १४२ रुपयांची वसुली झाली.

पश्चिम महाराष्ट्र

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणी साठ्यात चोवीस तासांत ०.२१ टीएमसीने वाढ झाली. कोयना धरणाचा पाणी साठा ८८.७५ टीएमसी झाला आहे...

01.54 PM

सांगली - स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रतिक्विंटल वितरण कमिशनमध्ये दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. सध्या प्रतिक्विंटलसाठी...

12.33 PM

कोल्हापूर -  येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय (सीपीआर), सावित्रीबाई फुले हॉस्पिटलसह काही रुग्णालयांतही ऑक्‍सिजन...

12.33 PM