सोलापूरसाठी वाढीव पाणीपुरवठा योजना द्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

सोलापूर - शहरासाठी एक हजार २४० कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी महापौर शोभा बनशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

सोलापूर - शहरासाठी एक हजार २४० कोटींची वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करावी, अशी मागणी महापौर शोभा बनशेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

बनशेट्टी यांनी फडणवीस यांची मंद्रूप येथे भेट घेऊन निवेदन दिले. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अश्‍विनी चव्हाण, नगरसेविका संगीता जाधव उपस्थित होत्या. सोलापूरला सध्या ज्या योजनांद्वारे पाणीपुरवठा होतो, त्या योजनांचा खर्च पालिकेच्या आवाक्‍याबाहेरचा आहे. नदीवाटे आलेले पाणी कर्नाटकातील शेतकरी उचलतात, सोलापूरसाठी फक्त १० टक्के पाणी मिळते. वाढीव पाणीपुरवठा योजनेबाबत केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांच्याशीही चर्चा झाली आहे. पालिकेने मागणी केल्यानुसार एक हजार २४० कोटींची योजना मंजूर केल्यास २०५१ पर्यंत शहराला रोज पाणी देणे शक्‍य होणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

रायपूरमध्ये आज बैठक
वाढीव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात चर्चा करण्यासाठी श्री. नायडू यांनी उद्या (गुरुवारी) रायपूरला बोलावले आहे. त्यामध्ये या योजनेबाबत निर्णय होण्याची शक्‍यता आहे, असे महापौर बनशेट्टी यांनी सांगितले.