सर्व शासकीय योजनांची माहिती आता एक क्लिकवर : युवा माहिती दुत उपक्रम कार्यान्वित 

yuva mahiti dut
yuva mahiti dut

उपळाई बुद्रूक(सोलापूर) : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने युनिसेफच्या सहकार्याने राज्य शासनाचे उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या प्रत्यक्ष सहभागाने ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम हाती घेतला आहे. विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती दारिद्ररेषे खालील तसेच ग्रामीण वा दुर्गम भागातील अशिक्षित व अर्धशिक्षित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविणे हे ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचे वैशिष्ट्य असणार आहे.

महाविद्यालयातील  विद्यार्थ्यांनी ’माहितीदूत’ होण्यासाठी  स्वत:हुन या अॅप्लीकेशनवर स्वत:च्या  नावाची  नोंदणी करावी. प्रत्येक महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांसाठी त्या महाविद्यालयातील एक अधिकारी ‘मार्गदर्शक’ म्हणून नेमण्यात येणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोबाईल अॅप्लिकेशन तयार करण्यात आले असुन, या मोबाईल अॅप्लीकेशनवर प्रत्येक  महाविद्यालयातील  मार्गदर्शक, समन्वयक आणि सहभागी युवक यांचे खाते असेल. सहभागी माहिती युवक दुतांनी प्रस्तावित लाभार्थ्यांना कोणत्या योजनांची माहिती द्यावी याकरीता तपशिल सांगणारा मजकूर, व्हिडीओ, एफएक्यू देण्यात आलेला आहे. त्याशिवाय योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, संबंधित शासकीय कार्यालयाचा संपर्क तपशिल असेल. प्रस्तावित लाभार्थ्याची भेट घेतल्यानंतर ‘युवा माहिती दूत’ हे त्या लाभार्थ्यांचा तपशील आपल्या मोबाईलमधील अॅप्लीकेशनवर  नोंदवितील या तपशिलानुसार संबंधित योजनांची माहिती अॅप्लीकेशनमधून घेऊन प्रस्तावित लाभार्थ्याना समजून सांगतील. लाभार्थ्यांना हे अॅप्लीकेशन डाउनलोड करण्यासाठी माहिती दूत मदत करतील. 

शासन अनुदानित वैयक्तिक लाभाच्या योजना प्रस्तावित  लाभार्थ्यांपर्यंत दुहेरी संवादातून त्यांच्यापर्यत प्रभावीपणे पोहचविण्यास राज्यातील समाजकार्याची आवड असलेल्या उत्साही तरूण वर्गाचे साहाय्य घेण्याच्या हेतूने ‘युवा माहिती दूत’  हा  उपक्रम माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या  राबविण्यात येत आहे. अशी माहिती सोलापूर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने दिली.


सर्व योजनांची माहिती मिळाणार या अॅपमध्ये
'माहिती दुत' या अॅप्लीकेशनच्या माध्यमातून शासनाच्या सर्व योजना, उपक्रमांची माहिती लाभार्थ्यांना एकाच ठिकाणी मिळणे शक्य होणार आहे. मार्गदर्शक, समन्वयक, माहिती दूत, प्रस्तावित लाभार्थी या सर्वांची नोंदणी मोबाईल क्रमांकाशी निगडीत असेल.

 या योजनेचा कालवधी
 या 'माहिती दुत' हि योजना ऑगस्ट २०१८ ते जानेवारी २०१९ पर्यंत असणार आहे. जे युवक माहिती दुत म्हणून कार्य करतील त्यांना योजनेच्या शेवटी डिजिटल प्रमाणपत्र दिले जाईल. 


राज्य शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी माहिती दूत बनावे. युवकांना माहिती दूत च्या माध्यमातून विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
- रवींद्र राऊत, जिल्हा माहिती अधिकारी सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com