राष्ट्रीय महामार्गावरील अपुर्ण कामांचे अपघाताला निमंत्रण

सुनील अकोलकर 
रविवार, 22 एप्रिल 2018

कल्याण विशाखपट्टणम या राष्ट्रीय महामार्ग येथील दूध शीतकरण केंद्र ते शासकीय विश्रामगृह या एक किलोमीटर अंतरामध्ये बाजारपेठ असल्याने रस्ता दुभाजकासाठी जागा सोडलेली आहे. रस्त्यासाठी सोडलेले खड्डे व त्यात साचलेल्या खडीमुळे अपघात घडत आहेत.

तिसगाव (नगर) - राष्ट्रीय महामार्गावरील तिसगाव (नगर) मधील रस्त्यातील दुभाजकाच्या अपुर्ण कामामुळे दररोज अपघाताच्या घटना घडत आहेत. 

कल्याण विशाखपट्टणम या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडले आहे. येथील दूध शीतकरण केंद्र ते शासकीय विश्रामगृह या एक किलोमीटर अंतरामध्ये बाजारपेठ असल्याने रस्ता दुभाजकासाठी जागा सोडलेली आहे. रस्त्यासाठी सोडलेले खड्डे व त्यात साचलेल्या खडीमुळे अपघात घडत आहेत.

चार चाकी वाहनांचे दुभाजकाच्या खड्यातुन पुन्हा रस्त्यावर घेताना मोठे नुकसान होत आहे. बसस्थानक परिसरातील पाथर्डी रस्त्यावरही अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे अपघात घडत आहेत. बाजारपेठेतील गटाराच्या अर्धवट कामामुळे पाणी वाहून जात नसल्याने बाजारपेठेत दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग त्रस्त झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम बंद असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

अपूर्ण रस्ता दुभाजकाचे आणि गटारीचे काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा तिसगावचे युवानेते भाऊसाहेब लवांडे यांनी यावेळी दिला. 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Invitations for accident on national highways due to Incomplete Work