इस्लामपुरात पोलिस यंत्रणा सज्ज 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 नोव्हेंबर 2016

इस्लामपूर : इस्लामपूर नगरपालिका निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये व निवडणूक व्यवस्थितपणे पार पडण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असल्याची माहिती पोलिस उपाधीक्षक वैशाली शिंदे यांनी दिली. निवडणुकीसाठी एक पोलिस उपाधीक्षक, तीन पोलिस निरीक्षक, 11 सहायक पोलिस निरीक्षक, 237 पोलिस कर्मचारी, 145 होमगार्ड व 1 एसआरपीची तुकडी बंदोबस्तासाठी तैनात आहेत. 

त्या म्हणाल्या,""नागरिकांनी निर्भयपणे मतदान प्रक्रियेला सामोरे जावे. कोणताही अनुचित प्रकार व गैरप्रकार आढळून आल्यास पोलिस प्रशासनाशी संपर्क साधावा, कोणाचीही गय केली जाणार नाही. तसेच निवडणुकीसाठी प्रलोभन म्हणून पैसे अथवा वेगवेगळे आमिष दाखवण्यात येत असेल तर त्याची माहिती पोलिसांना कळवावी, पोलिस संबंधितांवर कारवाई करतील. लोकांनी कायदा हातात घेऊ नये.

शहरातील प्रमुख चौक, प्रत्येक प्रभागात पोलिस कार्यरत आहेत. त्यामुळे मतदान प्रक्रिया अगदी सुरळीत पार पडेल. कोणत्याही दबावाखाली पोलिस यंत्रणा काम करणार नाही. दबाव आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रात्री दहा नंतर नागरिकांनी घराबाहेर शक्‍यतो पडू नये. जमावबंदी असल्याने रात्री जमावाने आढळणाऱ्या लोकांवर कारवाई करू.'' निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आज प्रमुख मार्गावरून पोलिसांनी संचलन केले. 

Web Title: Islampur police force ready for Elections