केडगाव हत्याकांड प्रकरणी गुंजाळ, केदारला न्यायालयीन कोठडी 

crime
crime

नगर : केडगावमधील दुहेरी हत्याकांड प्रकरणातील चौघांची पोलिस कोठडीची मुदत आज संपत असल्याने त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयातील सह दिवाणी न्यायाधीश सोनल पाटील यांच्या समोर हजर करण्यात आले. न्यायालयाने संदीप गुंजाळ व बाबासाहेब केदारला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी तर संदीप गिऱ्हे व महावीर मोकळेच्या पोलिस कोठडीत चार दिवसांची मुदतवाढ दिली. 

केडगावमधील शिवसेनेचे कार्यकर्ते संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या खून प्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी चार जणांची पोलिस कोठडी आज संपत होती. म्हणून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. गिऱ्हे व मोकळे यांनी पोलिसांना घटनास्थळी असल्याची कबुली दिल्यामुळे त्यांना माहिती कोणाकडून मिळाली, त्यांचा घटनेतील सहभाग काय या संदर्भातील माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी आरोपींना पोलिस कोठडीची मागणी केली. मात्र संदीप गुंजाळच्या पोलिस कोठडीची मुदत वाढ होऊ शकत नसल्याने संदीप गुंजाळ व बाबासाहेब केदार यांना चार मे पर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली. तर संदीप गिऱ्हे व बाबासाहेब मोकळेला अधिक तपासासाठी चार दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. सरकारी वकील म्हणून ऍड. सीमा देशपांडे यांनी काम पाहिले. 

गिऱ्हे व मोकळेनी दिली कबुली 
केडगाव दुहेरी हत्याकांडाशी संदीप गिऱ्हे व महावीर मोकळे आपला सहभाग सांगत नव्हते. मात्र आता गिऱ्हे व मोकळे यांनी घटनास्थळी हजर असल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. गिऱ्हे व मोकळे यांच्याकडून कोणी व काय केले, घटना स्थळी कसे पोचले, त्यांचा घटनेतील सहभाग काय याची माहिती करून घ्यायचे आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com