ताकारी, टेंभूची अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करा - कदम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 जुलै 2017

कडेगाव - कडेगाव तालुक्‍यात काही पोटकालवे व वितरिकांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळे ताकारी, टेंभूच्या लाभक्षेत्रात असणारी अनेक गावे या योजनांपासून वंचित राहिली आहेत. ही अपूर्ण कामे तत्काळ पूर्ण करा, असे आदेश माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. 

पुणे येथील सिंचन भवनात माजी मंत्री आमदार पतंगराव कदम यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीला जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता टी. एन. मुंडे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक आर. बी. घोडे, सांगली पाटबंधारे विभाग सांगलीचे अधीक्षक अभियंता हणमंतराव गुणाले उपस्थित होते. 

आमदार कदम म्हणाले, ‘‘येतगाव, तुपेवाडी, कान्हरवाडी या गावांतील शेतजमिनीला पाणी देण्यासाठी वितरिका क्रमांक ६ चे  काम तातडीने पूर्ण करून पाणी द्यावे, अशा सूचना  केल्या. त्यावर सर्व्हेचे काम सुरू आहे. सर्व्हे करून कामाच्या निविदा काढण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. 

टेंभू योजनेच्या कामथी कालव्याच्या १४ व्या किमी मध्ये असणाऱ्या बोंबाळेवाडी तलावात पूर्ण क्षमतेने पाणी जात नाही. आता ऐन पावसाळ्यात हा तलाव कोरडा पडला आहे, असे आमदार पतंगराव कदम यांनी सांगितले. टेंभू योजनेच्या लाभक्षेत्रात भौगोलिक सलगतेनुसार रायगावचा तसेच कडेगाव तलावाचा समावेश करावा तसेच ढाणेवाडी गावाला सिंचन सुविधा देण्यासाठी सर्व्हे करून ठोस पर्याय काढावा, तडसर तलावात टेंभू योजनेच्या सुर्ली कालव्यातून नेर्ली हद्दीतून बोगद्याद्वारे पाणी आणले आहे. यातील अपूर्ण कामांना मंजुरी द्यावी, असे सांगितले. यावेळी आमदार पतंगराव कदम यांनी सोनसळ, शिरसगाव येथील शेवटच्या  भागाला ताकारी योजनेचे पाणी पोहोचत नाही याबाबतही अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबतचा सर्व्हे करून भौगोलिक सलगतेनुसार आराखडा सादर केलेला आहे.