शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजेत - डॉ. पतंगराव कदम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

कडेगाव - देश व राज्याच्या इतिहासात शेतकरी स्वत:हून संपावर जाण्याची ही पहिली व मोठी घटना आहे. कर्जबाजारी-पणामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत. तेव्हा शासनाने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणे गरजेचे असून त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजेत, अशी मागणी आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केली.

ते म्हणाले, स्वामिनाथन समितीच्या शिफारशीची न झालेली अंमलबजावणी आणि कर्जमाफी, अशी प्रामुख्याने दोन संपाची कारणे आहेत. आज शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नाही. यासाठीच्या चळवळी हिंसात्मक होता कामा नयेत. सनदशीर मार्गाने संप करून शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत. या संपाचा कोणी राजकीय फायदा घेऊ नये. शेतकरी आत्महत्येचे शासनाने चिंतन, मनन करून आत्महत्या कशा रोखता येतील, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. लोकशाहीमध्ये लोकांचे प्रश्‍न सोडविणे गरजेचे आहे.