शेतकरी मारहाणीतून वाळूतील मुजोरी अधोरेखित 

सचिन शिंदे
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

कऱ्हाड - वाळू ठेक्‍यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच झालेली मारहाण वाळू ठेकेदारांची वाढती मुजोरी स्पष्ट करणारी आहे. सरकारी कार्यालयातच शेतकऱ्यांवर पिस्तूल रोखण्याचा झालेला प्रकार निंदनीय आहेच. त्याहीपेक्षा त्या प्रकाराची पोलिस ठाण्यात दाखल करण्यासाठी झालेली चालढकल व त्यातून झालेली "सेटलमेंट' वाळू व्यावसायिकांच्या मुजोरीला बळ देणारी ठरत आहे. तहसीलदारांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हा दाखल करण्याचा अहवाल देणार असल्याचे जाहीर केले आहे. तोही अहवाल सत्य परिस्थितीचा असावा. काल मारामारीच्या प्रकारानंतर हे प्रकरण रफादफा केले गेले.

कऱ्हाड - वाळू ठेक्‍यास विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच झालेली मारहाण वाळू ठेकेदारांची वाढती मुजोरी स्पष्ट करणारी आहे. सरकारी कार्यालयातच शेतकऱ्यांवर पिस्तूल रोखण्याचा झालेला प्रकार निंदनीय आहेच. त्याहीपेक्षा त्या प्रकाराची पोलिस ठाण्यात दाखल करण्यासाठी झालेली चालढकल व त्यातून झालेली "सेटलमेंट' वाळू व्यावसायिकांच्या मुजोरीला बळ देणारी ठरत आहे. तहसीलदारांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून गुन्हा दाखल करण्याचा अहवाल देणार असल्याचे जाहीर केले आहे. तोही अहवाल सत्य परिस्थितीचा असावा. काल मारामारीच्या प्रकारानंतर हे प्रकरण रफादफा केले गेले. मारहाण झालेले शेतकरी पोलिसात फिरकले नाहीत. इतका मोठा त्यात झालेला राजकीय हस्तक्षेप बरेच काही सांगून जातो. 

येथील तहसीलदार कार्यालयाच्या आवारातच वाळू उपशाला विरोध केला म्हणून शेतकऱ्यांना पिस्तूलाचा धाक दाखवत वाळू व्यावसायिकांनी मारहाण केली. काल सायंकाळी घटना घडली. त्याचा गुन्हा दाखल अद्यापही झालेला नाही. तो दाखल करू नये, असे प्रशासन, पोलिस व संबंधित शेतकऱ्यांवर मोठे राजकीय दडपण आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एकाला रात्री उशिरा सोडून देण्यात आले आहे. वाठार येथे दोन गटांत वाळू उपसा सुरू आहे. तो अवैध आहे. त्यावर कारवाई करावी, अशी मागणी वाठारच्या ग्रामस्थांनी केली होती. एक गट सोडून दुसऱ्या गटातून होणारा उपसा बेकायदेशीर आहे, असे शेतकऱ्यांचे म्हणणे होते. त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार केली होती. त्यानुसार त्या भागाची पाहणी तहसीलदार कार्यालयाने केली. त्याची कार्यावाही सुरू होती. त्यावेळी सारेच लोक होते. त्यानंतर सर्वजण येथील तहसीलदार कार्यालयात आले. त्यावेळी शेतकऱ्यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडला. 

शेतकऱ्यांना पिस्तूल रोखून झालेली मारहाण चुकीची आहे. त्याचा लेखी अहवाल देणार असल्याचे तहसीलदार राजेंद्र शेळके यांनी काल सांगितले आहे. त्यानुसार ते काय अहवाल देणार, याकडे आता लक्ष लागून आहे. घटनेने वाळू व्यावसायिकांच्या मुजोरीपणाला लगाम कोण घालणार? हाच प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्‍यात मुबलक वाळू आहे. त्या वाळू उपशातून होणारा गैरप्रकारही काल समोर आला आहे. त्या गोष्टीलाही लगाम घालण्याची गरज आहे. आपला गट सोडून शेजारच्या गटातून होणारा वाळूउपसा तपासण्यासाठी गेलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांवरही हल्ला झालेल्या घटना ताज्या आहेत. अशी बिकट स्थिती असतानाही वाळू व्यावसायिकांशी अर्थपूर्ण संबंध ठेवणाऱ्या शासकीय यंत्रणेबाबत अधिक धोका निर्माण झाला आहे. काल मारहाणीनंतर शेतकऱ्यांसह यंत्रणेला वेठीस धरून दबाव आणण्याचा झालेल्या हालचाली वाळू व्यावसायिकांना बळ देणाऱ्या ठरत आहेत. त्यावर योग्य कारवाई करण्यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. 

संयुक्त प्रामाणिकपणाची गरज 
वाळू व्यवसायाशी संबंधित सर्व व्यवहार या घटनेने चर्चेत आले आहेत. त्या सगळ्या तक्रारींची सडेतोड चौकशी होण्यासाठी महसूल व पोलिस खात्याने प्रामाणिकपणे काम करण्याची गरज आहे. त्या कामात संयुक्त प्रामाणिकपणा महत्त्वाचा ठरणार आहे.

Web Title: karad news farmer sand