कऱ्हाड तालुक्यात बनावट दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 17 ऑगस्ट 2017

कऱ्हाड - सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात विक्रीस येणारी बनावट दारू कऱ्हाड तालुक्यात येणपे येथे जप्त झाली. उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने कारवाई केली. त्यात पावणे तीन लाखाची दारू जप्त झाली आहे. त्यात काही बनावट दारूही आहे, असे उत्पादन शुल्क खात्याने सांगितले. त्या प्रकरणी प्रदीप पांडुरंग साळुंखे (वय २६, रा. पाडळी, ता. शिराळा) व दारू विक्रेता सचिन अण्णा वाघ (रा. वाकुर्डे, ता. शिराळा) यांना अटक झाली आहे. सांगली जिल्ह्यातून उंडाळे येथे ती दारू विक्रीस येणार होती. त्यावेळी उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने येणपे येथील खिंडीत सापळा रचून त्यास पकडले. त्यावेळी सुमो सापडली.

कऱ्हाड - सांगली जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात विक्रीस येणारी बनावट दारू कऱ्हाड तालुक्यात येणपे येथे जप्त झाली. उत्पादन शुल्क खात्याच्या भरारी पथकाने कारवाई केली. त्यात पावणे तीन लाखाची दारू जप्त झाली आहे. त्यात काही बनावट दारूही आहे, असे उत्पादन शुल्क खात्याने सांगितले. त्या प्रकरणी प्रदीप पांडुरंग साळुंखे (वय २६, रा. पाडळी, ता. शिराळा) व दारू विक्रेता सचिन अण्णा वाघ (रा. वाकुर्डे, ता. शिराळा) यांना अटक झाली आहे. सांगली जिल्ह्यातून उंडाळे येथे ती दारू विक्रीस येणार होती. त्यावेळी उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाने येणपे येथील खिंडीत सापळा रचून त्यास पकडले. त्यावेळी सुमो सापडली. त्यात विदेशी दारूचे पंधरा बाॅक्स सापडले. त्यात पाच बाॅक्स दारू बनावट असल्याचे तपासात स्पष्ट झाले. सचिन वाघ याच्या वाकुर्डे येथील घरावर छापा  टाकला. तेथेही सहा बाॅक्स जप्त झाले. विभागीय आयुक्त संगीता दरेकर, अझीक्षक स्नेहलता श्रीतर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरिक्षक पी. सी. शेलार, सतीश कोळभोर, उत्तम सावंत, जीवन शिर्के, सचिन खाडे, नितीन जाधव, विनोद बनसोडे व महेश मोहिते यांनी कारवाई केली. कारवाईत बनावट दारूसह दोन लाख ७५ हजार २१६ रूपयांचा मुद्देमाल जप्त झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्र

सातारा - जिल्हा शासकीय रुग्णालयातील गैरसोयींमुळे सर्वसामान्य नागरिकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. रुग्णांसह त्यांच्या...

02.39 AM

कऱ्हाड - मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानांतर्गत जागर युवा संवाद कार्यक्रमाद्वारे...

01.39 AM

सोलापूर - प्राप्त स्थितीशी सामना करत समर्थ बनून सक्षम व उद्योजिका बनण्याचा कानमंत्र लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महाविद्यालयातील...

12.24 AM