वीज अंगावर पडून मनवमध्ये विद्यार्थी ठार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

कऱ्हाड - मनव येथील नववीतील विद्यार्थी अंगावर वीज पडून जागीच ठार झाला. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्रतीक अनिल गोसावी (वय 15) असे त्याचे नाव आहे. 

कऱ्हाड - मनव येथील नववीतील विद्यार्थी अंगावर वीज पडून जागीच ठार झाला. आज सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्रतीक अनिल गोसावी (वय 15) असे त्याचे नाव आहे. 

पोलिसांनी सांगितले, की प्रतीक आज डोंगरात जनावरे चारण्यासाठी गेला होता. सायंकाळी विजांच्या कडकडाटात पाऊस आला. घरी परतताना प्रतीकच्या अंगावर वीज पडल्याने तो जागीच ठार झाला. अन्य लोकांच्या प्रकार लक्षात येताच त्यांनी त्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना, ग्रामस्थांना दिली. सर्वांनी तिकडे धाव घेतली. पोलिसांनाही कळविले. ग्रामस्थांनी ट्रॅक्‍टरच्या साह्याने प्रतीकचा मृतदेह डोंगरातून खाली आणला. प्रतीक नांदगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये नववीत शिकत होता. त्याच हायस्कूलवर त्याचे वडील नोकरीस आहेत. 

टॅग्स