व्यापारी महिलेवर कऱ्हाडमध्ये हल्ला 

व्यापारी महिलेवर कऱ्हाडमध्ये हल्ला 

कऱ्हाड - येथील प्रभात टॉकीजसमोर असलेल्या कापड दुकानदार महिलेवर एका गुन्हेगाराने काचेच्या तुकड्याने हल्ला केल्याची घटना आज दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी साजिदा नफिसा खान (वय 35 रा. मंगळवार पेठ, कऱ्हाड) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली असून, संशयित विशाल रवींद्र वारे (रा. बुधवार पेठ, कऱ्हाड) याला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवत संशयितावर कडक कारवाईची मागणी केली. 

दुपारी साडेबारा वाजता विशाल दुकानात आला. त्याने पैशांची मागणी करत स्वतःच्या गळ्यावर, हातावर ब्लेडने वार करून घेण्यास सुरवात केली. या प्रकाराने साजिदा खान यांनी आरडाओरडा केला. संशयिताने दुकानाच्या काउंटरची काच बुक्कीने फोडून काचेच्या तुकड्याने साजिदा यांच्या हातावर वार केला. त्यामुळे त्या रक्तबंबाळ अवस्थेत मदतीसाठी ओरडल्या. शेजारच्या दुकानातील पंकज प्रजापती, अरविंद दोशी तिकडे धावले. त्यांनी हा प्रकार पोलिसांना कळवल्यावर पोलिस आले. त्यांनी वारे याला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. नंतर रुग्णालयात नेण्यात आले. साजिदा खान यांनाही व्यापाऱ्यांनी रुग्णालयात दाखल केले. 

खंडणीचा प्रकार वारंवार होत असल्याने संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी एकत्र येत व्यवहार बंद ठेवले. संशयितावर कडक कारवाईची मागणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com