पोलिस बंदोबस्तावर; कऱ्हाडकर वाऱ्यावर!

सचिन शिंदे
शनिवार, 1 एप्रिल 2017

शहर पोलिस ठाण्यातील तब्बल ९७ जण बाहेरगावी; ३५ जणांवरच कारभाराची भिस्त 
कऱ्हाड - यात्रा, जत्रांसह वेगवेगळ्या बंदोबस्तासाठी पोलिस कर्मचारी गेल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील मोठे पोलिस ठाणे अशी नोंद असलेल्या कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात कर्मचाऱ्यांचीच कमतरता आहे. अवघ्या ३५ कर्मचाऱ्यांवर ठाण्याचे दैनंदिन काम सुरू आहे. तब्बल ९७ हून अधिक कर्मचारी बाहरेच्या बंदोबस्तासाठी गेले आहेत, तर रोजच्या कामासाठी किमान ७० कर्मचारी गुंतून राहात आहेत. त्यामुळे पोलिस ठाण्यातील दैनंदिन कामाची भिस्त अवघ्या काही कर्मचाऱ्यांवरच अवलंबून आहे. 

दरम्यान, आठवडाभरापासून पोलिसांवर कामाचा ताण वाढू लागला आहे. तक्रार देण्यासाठी आलेल्यांनाही कर्मचारी सापडत नाहीत, अशी स्थिती असून, महत्त्वाच्या तपासाची कामेही अर्धवट राहिली आहेत. शहर पोलिस ठाण्यांतर्गत शहरासह २१ गावांची जबाबदारी आहे. ओगलेवाडी व मलकापूर अशी दोन दूरक्षेत्रही आहेत. शहरात काही पोलिस चौक्‍यांद्वारे कामाची विभागणी केली आहे. शहर पोलिस ठाण्यात २३८ कर्मचाऱ्यांची संख्या मंजूर आहे. त्यातील केवळ १९७ कर्मचारी प्रत्यक्ष कामावर, तर ४० कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह १५ अधिकारी मंजूर असूनही प्रत्यक्षात १३ अधिकारीच हजर आहेत. गुन्हेगारीच्या दृष्टीने महत्त्वाचे मोठे पोलिस ठाणे अशी पोलिस दलाकडेच नोंद असलेल्या कऱ्हाड पोलिस ठाण्यात काही जागा रिक्त आहेत. त्यातच वेगवेगळ्या बंदोबस्तासाठी पोलिसांची रवानगी झाली आहे. परिणामी ठाण्यातच पोलिसांना शोधण्याची वेळ आली आहे. अधिकारी व कर्मचारी वेगवेगळ्या बंदोबस्तासाठी गेल्याने दैनंदिन काम चालविण्यासाठी केवळ ३५ कर्मचारी असल्याचे दिसत आहे. 

शहरात वेगवेगळ्या लोकांना सात कर्मचारी सुरक्षा रक्षक म्हणून देण्यात आलेत. सात लोक पोलिस उपअधीक्षकांच्या कार्यालयात नेमणुकीस आहेत. तुरुंग व अन्य गार्डसाठी २४, ठाणे अंमलदार व त्यांच्या कामासाठी ४० लोक असतात. त्याशिवाय रात्रगस्तीमुळे दिवसा कामावर न येणारांची संख्या ४० आहे. त्यामुळे सगळ्या वाटपातून ठाण्याच्या दैनंदिन कामासाठी केवळ ३५ कर्मचारीच मिळतात. ठाण्यातच पोलिसांना शोधण्याची वेळ आली आहे.

Web Title: karad police bandobast