खंबाटकीत प्रवास म्हणजे  कुटुंबाच्या जीवाला घोर! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 12 एप्रिल 2018

खंडाळा - खंबाटकी घाटात होणाऱ्या अपघातांच्या मालिकेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या घाटातून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या नातेवाईकाला त्याच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे. त्यामुळे खंबाटकी घाट म्हणजे जीवाला घोर अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. 

खंडाळा व परिसरातील अनेक गावांतील नागरिक नोकरी व व्यवसायानिमित्त सातारा व वाई बाजूकडे दररोज ये-जा करतात. संपूर्ण घाटात आजअखेर झालेले एकूण अपघात, त्यातील मृतांचा आकडा व गंभीर जखमींची संख्या पाहता ही आकडेवारी कुटुंबीयांना घोर लावणारीच आहे. खंबाटकी घाटातील फक्त "एस' वळणावर 2008 पासून 116 अपघात झाले असून 73 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 273 जण गंभीर जखमी झालेत. या "एस' वळणाने अनेक कुटुंबांवर अस्मानी संकट कोसळले आहे. खंडाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अपघातांची संख्या पाहता 2008 पासून आजअखेर 760 अपघात झाले आहेत. त्यात 298 जणांचा बळी गेला आहे, तर एक हजार 199 लोक गंभीररित्या जखमी झालेत. यातील अनेक अपघात खंबाटकी घाटातील आहेत. 

Web Title: khadala news Khambatki Ghat