जोरदार पाऊस नसल्याने खरीप पिके अडचणीत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

नगर - जिल्ह्यात अजूनही जोरदार पाऊस झाला नसल्याने पाणी साठवण झालेले नाही. पंधरा दिवसांपासून तर पाऊस पूर्णपणे गायब झाला असल्याने आता शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. पेरलेली पिके जगवायची कशी या चिंतेने शेतकरी धास्तावले आहे.

यंदाचा पावसाळा सुरू होऊन आता दोन महिन्यांचा कालावधी झाला आहे. मात्र, अजूनही अकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भाग वगळता जिल्ह्यात कोठेही जोरदार पाऊस झालेला नाही. गेल्या पंधरा दिवसांपासून तर पावसाने पूर्णतः उघडीप दिली आहे. त्यामुळे पेरणी, कापूस लागवड केली खरी; पण आता पिके हातची जातात की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

Web Title: kharif crops not quite rain