कर्जमाफीवरून किसान सभा पुन्हा आक्रमक 

तात्या लांडगे
मंगळवार, 29 मे 2018

कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 5 जूनपर्यंत आहे. परंतु, बॅंकांकडून माहिती घेवून शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीचा लाभ तत्काळ द्यावा. आणखी 21 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी सरकारकडे शिल्लक आहे. परंतु, सरकार वारंवार क्‍ल्युप्त्या काढत वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे ऐन खरीप हंगामात लाखो शेतकऱ्यांना बॅंकांकडून नव्याने कर्ज मिळत नसल्याचे श्री. कलशेट्टी यांनी सांगितले.

सोलापूर : राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी केलेल्या कर्जमाफीची प्रक्रिया आता ठप्प झाली आहे. 12 मार्च रोजी किसान सभेने मोर्चा काढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या बाबींची अंमलबजावणी अद्यापही सुरू झालेली नाही. त्यामुळे आता जोवर राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळत नाही, तोवर टप्प्याटप्यात सरकारविरोधात आंदोलने केली जातील, अशी माहिती किसान सभेचे राष्ट्रीय सदस्य सिध्दप्पा कलशेट्टी यांनी दिली. 

कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत 5 जूनपर्यंत आहे. परंतु, बॅंकांकडून माहिती घेवून शेतकऱ्यांना थेट कर्जमाफीचा लाभ तत्काळ द्यावा. आणखी 21 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी सरकारकडे शिल्लक आहे. परंतु, सरकार वारंवार क्‍ल्युप्त्या काढत वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे ऐन खरीप हंगामात लाखो शेतकऱ्यांना बॅंकांकडून नव्याने कर्ज मिळत नसल्याचे श्री. कलशेट्टी यांनी सांगितले. 

असा राहणार कार्यक्रम 
- 1 जून : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे 
- 9 ऑगस्ट : जेलभरो आंदोलन 
- 5 स्पटेंबर : दिल्लीत पुन्हा मोर्चा 
- ऑक्‍टोबर : भारत बंद, रास्ता रोको 

शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या अंमलबजावणीमध्ये सरकार वेळकाढूपणा करत आहे. कुटुंबासाठी कर्जमाफी हा निर्णय मागे घेवून कुटुंबातील प्रत्येक सदस्याला कर्जमाफी मिळावी, एप्रिल 2001 ते मार्च 2009 या कालावधीतील थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ द्यावा. तसेच किसान सभेच्या ज्या-ज्या मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. त्याची तत्काळ अंमलबजावणी करावी. अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलने केली जातील. 
सिध्दप्पा कलशेट्टी, राष्ट्रीय सदस्य, किसान सभा

Web Title: kisan sabha statement on farmer loan waiver