कोल्हापुरी फेट्याची कला शिकण्यासाठी मुलींचाही प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

कोल्हापूर - येथील संत शिरोमणी सेना महाराज नाभिक युवक सांस्कृतिक संस्थेच्या पुढाकाराने मोफत फेटा बांधणी प्रशिक्षण कार्यक्रमाला आता मुली व महिलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. एकवीस आणि अठ्‌ठावीस जानेवारीलाही प्रशिक्षण वर्ग होणार आहेत. रंकाळा स्टॅंडसमोरील विद्यार्थी सेना वसतिगृहात दुपारी बारा ते दोन या वेळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

नाभिक समाजातील तरुणाई असो किंवा सौंदर्यप्रसाधने क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या तरुणाईपैकी बहुतांश तरुणाईही या कलेपासून लांब आहेत. त्यामुळेच संस्थेने हा उपक्रम हाती घेतला आहे. संस्थेचे अध्यक्ष मोहन चव्हाण, बाबासाहेब काशीद, प्रकाश टिपुगडे, रामभाऊ संकपाळ, दीपक खराडे, राहुल टिपुगडे, विवेक सूर्यवंशी, दिलीप टिपुगडे, लहू ताठे, तानाजी कोरे, तानाजी मर्दाने, राहुल संकपाळ, राजेंद्र मांडरेकर, प्रताप माने, संजय मांडरे आदींनी संयोजनात पुढाकार घेतला आहे. तेजस्विनी काशीद, भक्ती खराडे, सविता गायकवाड, प्रांजली काशीद, श्रध्दा संकपाळ, वैभवी संकपाळ आदी मुलींना प्रशिक्षण देत आहेत. 

पश्चिम महाराष्ट्र

शाखेत होती अठरा लाखाची रोकड; आरोपी सीसीटीव्ही कॅमेरात कैद श्रीगोंदे (जिल्हा नगर) : तालुक्यातील घोगरगाव येथील जिल्हा सहकारी...

04.51 PM

कोल्हापूर : शासनाकडून शेतकऱ्यांना जाहीर करण्यात आलेल्या कर्जमाफीचे भरण्यात येणाऱ्या आॅनलाईन, आॅफलाईन अर्ज नोंदींची माहिती...

04.48 PM

शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण : सौ.जाधव. मुरगूड (कोल्हापूर) : ज्ञानमंदिरात मिळालेल्या शिक्षणाच्या आणि संस्कार...

04.39 PM