कोल्हापूर फूड फेस्टिव्हल 17 फेब्रुवारीपासून

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 जानेवारी 2017

कोल्हापूर - तालेवार खवय्यांची आणि त्यांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या बल्लवाचार्यांची नगरी म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध आहे. बदलत्या काळात इथली खाद्यसंस्कृती बदलली, तरी तिने आपला पारंपरिक बाजही कायम ठेवला आहे. चोखंदळ खवय्यांच्या आग्रहाखातरच आता "सकाळ'ने कोल्हापूर फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. स्टॉल बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

कोल्हापूर - तालेवार खवय्यांची आणि त्यांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या बल्लवाचार्यांची नगरी म्हणून कोल्हापूर प्रसिद्ध आहे. बदलत्या काळात इथली खाद्यसंस्कृती बदलली, तरी तिने आपला पारंपरिक बाजही कायम ठेवला आहे. चोखंदळ खवय्यांच्या आग्रहाखातरच आता "सकाळ'ने कोल्हापूर फूड फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे. स्टॉल बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सासने मैदानाजवळील महाराणी लॉन (किरण बंगल्याशेजारी) येथे सलग चार दिवस हा खाद्ययात्रा महोत्सव रंगणार असून फूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध हिरा रोलर अँड फ्लोअर मिल्स प्रायव्हेट लिमिटेड महोत्सवाचे मुख्य प्रायोजक आहेत. न्यू गणेश कॅंटीन सर्व्हिसेस कॅंटीन पार्टनर आहे.

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात विश्रांती, सामाजिक सुरक्षिततेसाठी राज्यातील ज्या काही शहरांचा आवर्जून उल्लेख होतो, त्यात कोल्हापूरचा निश्‍चितच वरचा क्रमांक लागतो. स्पर्धेच्या युगात इथला माणूसही बदलतो आहे. बदलते तंत्रज्ञान आत्मसात करतो आहे. मात्र या बदलत्या दुनियेत आपली खास संस्कृती त्याने आवर्जून जपली आहे. अख्खा मसूर, खुष्का राईस, पंजाबी-चायनीजला इथे सध्या तरुणाईची मोठी मागणी असली, तरी त्याबरोबरच कोल्हापुरी मटण, पांढरा-तांबडा रस्सा, झुणका-भाकर, दही-खरडा भाकरी आजही सर्वांना भुरळ घालते. चमचमीत आणि झणझणीत कोल्हापूरची खाद्यसंस्कृती विविध बदल स्वीकारत आता खवय्यांची लज्जत वाढवत आहे. कटलेट, रगडा पॅटिस, गोबी मंच्युरियन, चिकन 65, बिर्याणी, आंबोळी-उत्ताप्पापासून ते व्हेज क्रिस्पी, चिकन क्रिस्पी, क्रीम व्हेज सूप, क्रीम चिकन सूप, चिकन मसाला, मटण मसाला, सुकं मटण, चिकन मुर्ग मसाला, चिकन टिक्का, चिकन सॅंडविच आदी रुचकर पदार्थांना येथे नेहमीच मागणी असते. अशा असंख्य व्हरायटींवर या खाद्ययात्रा महोत्सवातून ताव मारता येणार आहे. त्याशिवाय विविध जाम-सूपपासून बिस्कीट, विविध सरबतं, रोट, लोणची-पापड, मसाले, पॅकिंग राईस, फिश, खाद्यतेल, नमकिन्स, फिंगर चिप्स आणि मुखवासांपर्यंतचे फूड प्रॉडक्‍टस्‌ही महोत्सवात उपलब्ध असतील.

खवय्यांबरोबरच आपले प्रॉडक्‍ट अधिकाधिक कोल्हापूरकरांपर्यंत पोचवण्यासाठी विविध फूड कंपन्यांसाठी हा महोत्सव पर्वणी ठरणार आहे. चला, तर मग आजच स्टॉल बुकिंग करूया. अधिक माहितीसाठी संपर्क - सूरज-9922551918, संतोष - 9975513951.

"हिरा रोलर' विषयी...
फूड इंडस्ट्रीतील हिरो रोलर अँड फ्लोअर मिल्स ही पश्‍चिम महाराष्ट्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशी अग्रेसर कंपनी आहे. आठ हजार चौरस मीटर जागेत कंपनीचा विस्तार असून सर्व साधने संगणकीकृत आहेत. अडीच हजार मेट्रिक टनची स्टोअरेज तर रॉ मटेरियलसाठी 22 हजार चौरस फुटांचे गोडावून आहे. अन्न आणि औषधे प्रशासनाच्या सर्व नियमानुसारच येथे उत्पादनांची निर्मिती होते. मैदा, बेसन, चक्की फ्रेश आटा, सूजी, चना बेसन, बेकरी मैदा, चिप्समध्ये पुदिना मसाला, टॅंगी टोमॅटो, प्लेन साल्टेट, स्पायसी तडका, क्रीम अँड ओनियन, डाळीमध्ये मूग डाळ, चकना मिक्‍स, गुजराथी डाळ मोड, शेंग भुजिया, चना डाळीसह फिंगर चिप्स, व्हील्समध्ये विविध उत्पादनांना बाजारपेठेत मोठी मागणी आहे.