गारगोटी-पाटगाव मार्गावर अपघातात एक ठार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

गारगोटी -  जीप व मोटारसायकलच्या अपघातात पारदेवाडीचा एक जण ठार झाला तर एक जण जखमी झाला आहे. प्रदीप धोंडीराम रेडेकर (वय 30, रा. पारदेवाडी) असे मृताचे नाव आहे. हा अपघात गारगोटी - पाटगाव मार्गावरील आकुर्डे पुलानजीक झाला. 

प्रदीप रेडेकर व साताप्पा लक्ष्मण शिर्के हे दोघेही (रा. पारदेवाडी )  मोटारसायकलवरून (एमएच 09 बीडी 9466) गारगोटीहून गावी जात होते. आकुर्डेकडून येणाऱ्या जीपची त्यांच्या मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत ते दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी तात्काळ सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान प्रदीप रेडेकर याचा मृत्यू झाला. भुदरगड पोलीस अधिक तपास करीत आहेत. 