कोल्हापूरात ताबुत विसर्जन मिरवणुकीत बस घुसली, दोन ठार

कोल्हापूरात ताबुत विसर्जन मिरवणुकीत बस घुसली, दोन ठार

कोल्हापूर : ताबूत विसर्जन मिरवणुकीत के एम टी बस घुसली. शहरातील गर्दीने गजबजलेल्या पापाची तिकटी येथे आज रात्री ८ च्या सुमारास हा अपघात झाला. घटनेनंतर संतप्त जमावाने केएमटी बस वर हल्ला चढवला. या घटनेने परिसरातील वातावरण तणावपूर्ण झाले.

ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. बस खाली सापडून दोन ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याचे समजते. आज शहरात ताबूत विसर्जन मिरवणूक होती. या मिरवणुकीतील काही पंजे वाद्यांच्या गजरात पंचगंगा नदीकडे निघाले होते. त्याचवेळी शिवाजी चौकाकडून गंगावेश कडे निघालेल्या केएमटी बसचा ब्रेक निकामी होऊन मिरवणुकीत घूसली. यात दोन जण ठार तर एकजण जखमी झाला.. यावेळी तेथे तीन हजार लोकांचा समुदाय घटनास्थळी होता. तेथे आलेल्या अग्निशमन दलाच्या गाडीची काच देखील या वेळी फोडण्यात अली. परिस्थिती तणावपूर्ण असल्याने जलद कृती दलाचे दोन तुकड्या घटनास्थळी तैनात केल्या आहेत.

तानाजी भाऊ साठे  (वय 50 राजारामपूरी), व सुजय भाऊ अवघडे (वय 15 राजारामपूरी)  अशी दुर्घटनेत ठार झालेल्यांची नावे आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com