कोल्हापूर शहरात अपघातात पिंपळगाव खुर्दचे दोघे ठार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - राजहंस प्रिंटींग प्रेस जवळील धोकादायक खड्ड्याला सुरक्षा म्हणून ठेवण्यात आलेल्या सिमेंटच्या नळ्यात धडकून आज दुपारी सख्ये भाऊ ठार झाले. कसबा बावड्यातून सेंट्रींगचे काम पाहून ते परत जात असताना हा अपघात झाला. योगेश महादेव घाटगे (वय 32) आणि तेजस महादेव घाटगे (28, दोघे रा.पिपंळगावखुर्द, ता.कागल) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. योगेशच्या मागे पत्नी दोन मुलगे आणि एक मुलगी, आई,वडील असा परिवार आहे. तेजस अविवाहीत होता. याबाबतची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली. संबंधित ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी स्थानिक नगरसेवक राहूल चव्हाण यांनी येथे केली. 

धोकादायक म्हणून चर्चेत असलेल्या खड्यावर महापालिकेने सुरक्षेसाठी ठेवलेले सिमेंटचे नळच धाकादायक बनले आहेत. रोगा पेक्षा इलाजच भयंकर असल्याचा अनुभव येथील नागरिक रोज घेत आहेत. आजच्या अपघातानंतर स्थानिक नागरिकांसह स्थानिक नगरसेवक राहूल चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ठेकेदार आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांना त्यांनी तातडीने संपर्क साधून त्यांचा चांगलाच समाचार घेतला. घटनास्थळी प्रचंड गर्दी झाल्यामुळे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस तेथे थांबून होते. पोलिसांनी तातडीने पंचनामा केला. बघ्यांच्या गर्दीला हटविणे पोलिसांनाही अशक्‍य झाले. येथे महापालिका अधिकारी आणि ठेकेदार टिकेचे लक्ष्य बनले. 

घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, योगेश घाटगे आणि तेजस घाटगे दोघे सख्खे भाऊ होते. योगेश हा मोठा. तो गोकूळ शिरगाव मध्ये नोकरीस होता. तेजस सेंट्रींग काम करत होता. काम नसेल तेंव्हा योगेश हा तेजस बरोबर सेंट्रींग कामाला जाता होता. आज सकाळी दोघेही घरातून मोटारसायकलीवरून बाहेर पडले. घरी त्यांनी गोकूळ शिरगाव मध्ये जावून येतो म्हणून सांगितले होते. तेथून ते दोघे दुपारी थेट कसबाबावड्याकडे गेले. तेथे सेंट्रींगचे काम पाहून दुपारी चारच्या सुमारास गावाकडे जाण्यास निघाले. महावीर कॉलेजपासून पुढे खानविलकर पेट्रोल पंपाकडे जात असताना बसला ओव्हरटेक करण्यास संधी मिळाली नाही. त्यामुळे ते डाव्याबाजूनेच पुढे जात होते. मात्र पुढे खड्डा असल्यामुळे बस बाजूने पुढे गेली. समोर बस असल्यामुळे घाटगेंना खड्डा समजून आला नाही. यामुळे त्यांची मोटारसायकल थेट सिमेंटच्या नळाला धडकली आणि दोघे गंभीर होऊन तेथेच पडले अन्‌ मोटारसायकल नळातून पुढील बाजूस गेली. यावेळी झालेल्या मोठ्या आवाजामुळे स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तेंव्हा एकजण जागीच ठार झाला होता. दुसऱ्याचा श्‍वास सुरू होता. नागरीकांनी 108च्या रुग्णवाहिकेस संपर्क साधला त्यातून पहिला मयत झालेल्याला आणि नंतर जखमीला सीपीआर मध्ये नेण्यात आले. दरम्यानच्याकाळात जखमी असलेल्याचाही मृत्यू झाला. 
 
Web Title: Kolhapur news accident near rajhans printing press