साताऱ्यातील एकजण पन्हाळारोडवर अपघातात ठार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

कोल्हापूर - कोल्हापूर - पन्हाळा रस्त्यावरील रजपूतवाडी येथे झालेल्या अपघातात बोरखळ (जि. सातारा) येथील शिपाई शिकांत जगन्नाथ रसाळ हे जागीच ठार झाले. 

कोल्हापूर - कोल्हापूर - पन्हाळा रस्त्यावरील रजपूतवाडी येथे झालेल्या अपघातात बोरखळ (जि. सातारा) येथील शिपाई शिकांत जगन्नाथ रसाळ हे जागीच ठार झाले. 

कोल्हापूर येथील एसएससी बोर्ड कार्यालयात शाळेच्या कामासाठी शिकांत व लिपिक अविनाश युनूस बागडी हे आले होते. एसीसी बोर्डातील काम संपवून ते दोघे अंबाबाईच्या दर्शनास गेले. तेथून ते जोतिबा दर्शनासाठी जात असताना दुपारी एकच्या सुमारास त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. शेजारून जाणाऱ्या दुचाकीचा धक्का लागल्याने त्यांचा दुचाकीवरचा ताबा सुटला. त्याचवेळी अनोळखी वाहनाने त्यांना ठोकर दिली. यामध्ये शिकांत हे जागीच ठार झाले. लिपिक अविनाश युनूस बागडी हे जखमी झाले आहेत.