इंधन दरवाढीविरोधात शिवसेना, माकपची इचलकरंजीत निदर्शने

राजेंद्र होळकर
बुधवार, 30 मे 2018

इचलकरंजी - पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ येथील शहर शिवसेनेच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला तर मार्क्‍सवादी कम्युनिष्ठ पक्षाच्यावतीने शहरातील के. एल. मलाबादे चौकात निदर्शने करण्यात आली.

इचलकरंजी - पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ येथील शहर शिवसेनेच्यावतीने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला तर मार्क्‍सवादी कम्युनिष्ठ पक्षाच्यावतीने शहरातील के. एल. मलाबादे चौकात निदर्शने करण्यात आली.

शिवसेनेच्या मोर्चात मोटारील धक्का देत आंदोलक सहभागी झाले होते. ही मोटार नागरीकांचे लक्ष वेधून घेत होती.

केंद्रातील भाजप सरकाने सत्तेवर येण्यापूर्वी देशातील महागाई कमी करु, याबरोबर अनेक आश्‍वासने दिली होती. सत्ता काबीज करताच ही आश्‍वासने पाळली नाहीत. तसेच देशाची आर्थिक व सामाजिक स्थिती खालावत चालली असताना, केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची वारंवार दरवाढ केल्याने सामान्य जनतेला जगणे मुश्‍किल झाले आहे. या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ आज येथील शहर शिवसेनेच्यावतीने प्रांतकार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चाला सेनेच्या शहर कार्यालयापासून सुरुवात झाली.

मोर्चा शहराच्या मुख्य मार्गावरुन फिरुन प्रांतकार्यालयावर आला. मोर्चेकऱ्यांनी प्रांताधिकाऱ्यांना मागण्याचे निवेदन दिले. या मोर्चात सेनेचे जिल्हा प्रमुख मुरलीधर जाधव, शहर प्रमुख सयाजीराव चव्हाण, उपजिल्हा प्रमुख महादेव गौड, आंनद शेट्टी, महेश बोहरा, मलकारी लवटे, धनाजी मोरे, महिला आघाडीच्या प्रमुख मंगल चव्हाण, शिवाजी पाटील, शोभा मोरे, भारत पोवार आदी शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

माकपच्या वतीने निदर्शने
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ करुन पेट्रोलियन कंपन्याचे उखळ पांढरे केले आहे. या दरवाढीमुळे महागाई वाढून सर्वसामान्य जनतेला हैराण केले आहे. तरी सरकारने पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी येथील मार्क्‍सवादी कम्युनिष्ठ पक्षाच्यावतीने शहरातील के. एल. मलाबादे चौकात सकाळी निदर्शने केली.

यामध्ये दत्ता माने, ए.बी.पाटील, शिवगोंडा खोत, आनंदराव चव्हाण, भरमा कांबळे, सदा मलाबादे, पार्वती जाधव, बाळनाथ रावळ, सुभाष कांबळे, भाऊ कसबे, हनमंत मुत्तुर, गोपाळ पोला, बंडा पाटील, मारुती जाधव, चंद्रकांत गागरे, पांडू येशाल, प्रकाश कारके, नागेश पोला आदी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

Web Title: Kolhapur News agitation against Petrol rate hike