इडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो...!  - अजित पवार

संभाजी गंडमाळे
सोमवार, 2 एप्रिल 2018

कोल्हापूर - इडा पीडा टळो, बळीचं राज्य येवो...असे साकडे आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्री अंबाबाईला घातले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनासाठी आज ते येथे आले. सकाळी साडेनऊच्या सुमारास त्यांनी अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले.

दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी समाजातील एकाही घटकाला न्याय दिलेला नाही. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशा राज्यकर्त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही आणि म्हणूनच देवीला साकडे घातले असल्याचे श्री. पवार यांनी सांगितले. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, माजी महापौर आर. के. पोवार, आदिल फरास आदी यावेळी उपस्थित होते.

सर्वांना सुखी ठेवण्याची प्रार्थना 
माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही सकाळी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. त्या म्हणाल्या, ""अंबाबाई म्हणजे पैशाची नव्हे तर मनाच्या श्रीमंतीची लक्ष्मीमाता असून तिचे दर्शन घेण्याचे सौभाग्य मिळाले. सर्वांना सुख-समृध्दी लाभू दे, साऱ्यांना सुखी, समाधानी आयुष्य लाभू दे आणि समाजात शांतता व सुव्यवस्था रहावी, अशी प्रार्थना देवीकडे केली.''

यावेळी आमदार सतेज पाटील, देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यावेळी उपस्थित होते. देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे यांनी देवस्थान समितीतर्फे त्यांचे स्वागत केले.  
 
Web Title: Kolhapur News Ajit Pawar Comment