अंबाबाई पूजेबद्दल जाहीर माफी - अजित ठाणेकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

कोल्हापूर - माझ्या आठवड्यात शुक्रवारी श्री करवीरनिवासिनी अंबाबाईच्या बांधल्या गेलेल्या अलंकार पूजेवरून विवाद उत्पन्न झाला. अनवधानाने या पूजेमुळे श्री जगदंबेच्या भाविकांच्या मनात नाराजी निर्माण झाली व भावना दुखावल्या गेल्या. झाल्या प्रकाराबाबत मी समस्त भाविकांची जाहीर दिलगिरी व्यक्त करतो आणि माफी मागतो, अशा आशयाचे निवेदन आज श्रीपूजक व नगरसेवक अजित ठाणेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे. 

निवेदनात म्हटले आहे की, ‘‘झाल्या प्रकाराबद्दल पोलिस ठाण्यात दादही मागण्यात आली आहे. घटनेनुसार न्यायालय जो निर्णय करेल तो सर्वमान्य असेलच. सर्व प्रक्षोभासाठी अजाणतेपणाने मी जबाबदार असल्याचे अनेकजण सांगत आहेत. त्यामुळे जनभावनेचा सन्मान करण्याकरिता आणि कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार मी कायदा व सुव्यवस्थेची स्थिती सामान्य होईपर्यंत मंदिरापासून अलिप्त राहीन.’’