मंत्री दूरच, राणेंनी आधी आमदार व्हावे - दुधवडकर

मंत्री दूरच, राणेंनी आधी आमदार व्हावे - दुधवडकर

कोल्हापूर -  ‘भाजपची मस्ती ही सत्तेची मस्ती असून दादांच्या दारातील ‘लक्ष्मी’ ही उद्या आमच्या दारात येईल, त्यावेळी पाहून घेऊ, असा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी आज दिला. जिल्ह्यातील शिवसेनेचे सहा आमदार घट्ट असून ते कुणाच्याही गळाला लागणार नाहीत,’ असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. नारायण राणे यांनी आधी आमदार होऊन दाखवावे, मंत्रिपदाची स्वप्ने नंतर पाहावीत असा टोलाही त्यांनी लगावला, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शुक्रवारी (ता. २४) कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्याची माहिती दुधवडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ते म्हणाले, ‘‘विदर्भ आणि मरावाड्यात शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर पक्षप्रमुख पश्‍चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणी ते जाणून घेत आहेत. जीएसटीमुळे व्यापारी, उद्योजकांच्या अडचणी वाढल्या आहेत त्यांच्याशी ते संवाद साधतील. या मागे विधानसभा निवडणुकीचे राजकारण नाही. भाजप म्हणते शेतकरी किती सुखी आहे. ते खरचं किती सुखी आहे. हे पाहण्यासाठी पक्षप्रमुखांचा दौरा आहे.
मंत्रिमंडळातील आपला प्रवेश रोखण्याची धमक शिवसेनेत नसल्याचे नारायण राणे यांनी म्हटले आहे. त्यासंबंधी विचारणा केली असता  दुधवडकर म्हणाले, ‘‘राणे मंत्री होणे तर दूरच त्यांनी आधी आमदार होऊन दाखवावे, सिधुदुर्गंचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासंबंधी राणे वक्तव्ये करतात ती दुर्दैवी आहेत. सीडी दाखविण्याची ते भाषा करतात. त्यांनी खुशाल दाखवाव्यात.’’

पक्षप्रमुख निर्णय घेतील
आमदार नीतेश राणे यांच्या जागी नारायण राणे उभे राहिल्यास त्यांच्या विरोधात आपल्या नावाची चर्चा असल्याचे विचारताच दुधवडकर यांनी या संबंधीचा निर्णय पक्षप्रमुख घेतील असे सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com