गडहिंग्लजच्या स्पर्धेत लिंगनूर, बेळगाव, कोल्हापूरची म्हैस प्रथम

गडहिंग्लजच्या स्पर्धेत लिंगनूर, बेळगाव, कोल्हापूरची म्हैस प्रथम

गडहिंग्लज - अर्जुन उद्योग समुहातर्फे येथील मार्केट यार्ड परिसरात देखणी म्हैस स्पर्धा, म्हैस पळविणे स्पर्धा उत्साही वातावरणात झाल्या. कोल्हापूर व बेळगाव जिल्ह्यातून 50 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते.

जाफराबादी गटातून मोहन चोथे (लिंगनूर), पंढरपुरीमध्ये दत्तात्रय शिंगाटे (यळ्ळूर, बेळगाव) यांच्या म्हैशी तर म्हैस पळविणे स्पर्धेत बेळगाव येथील निखिल देसाई यांच्या म्हैशीने प्रथम क्रमांक पटकावले. सतीश दळवी (गिजवणे) यांचा मुऱ्हा रेडा देखणा रेडा म्हणून बहुमान मिळविला.

देखणी म्हैस स्पर्धा तीन गटात घेण्यात आल्या. पंढरपुरी गट - मेहना आगा (आजरा), यलाप्पा मुदगेकर (बेळगाव), जाफराबादी गटात संगीता बेळगुद्री, कविता बेळगुद्री (गडहिंग्लज), मुऱ्हा गटात चंद्रकांत माने (मुगळी), दिलीप देसाई (आजरा), संजय शिंदे (हिरलगे) यांच्या म्हैशींनी यश मिळविले. या सर्वांना सरकी पेंड व ढाल बक्षीस देण्यात आले.

म्हैस पळविणे स्पर्धेत खुल्या गटात निलेश चौगुले (बेळगाव), संकेत पाटील (कोल्हापूर) यांच्या म्हैशींनी यश मिळविले. त्यांना रोख रक्कमेसह सरकी पेंड देण्यात आले.

देशी म्हैस पळविणे स्पर्धेत यशोदा रेडेकर (जरळी), सतीश दळवी (गिजवणे), युवराज कोरी (गडहिंग्लज) यांच्या म्हैशीने अनुक्रमे क्रमांक पटकावले. देशी रेडी गटात सतीश दळवी, संजय शिंदे, काशिनाथ घुगरे यांच्या रेडींनी यश मिळविले. गावगणना रेडकू पळविणे स्पर्धेत विनायक येडूरकर (बसर्गे), रितेश देसाई (निंगुडगे) व भैराण्णा पाटील (गडहिंग्लज) यांच्या रेडकाने अनुक्रमे क्रमांक पटकावले. 

स्पर्धा पाहण्यासाठी तालुक्‍यातील हजारो हौशी पशुपालकांनी हजेरी लावली होती. मार्केट यार्डचा परिसर गर्दीने फुलून गेला होता. अर्जुन उद्योग समुहाचे संतोष शिंदे यांनी संयोजन केले होते. उपनगराध्यक्ष नितीन देसाई, सविता देसाई यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. नगराध्यक्षा स्वाती कोरी, विद्याधर गुरबे, नागेश चौगुले, आप्पा शिवणे, वसंतराव यमगेकर, अमर चव्हाण, युवराज बरगे, श्रद्धा शिंत्रे, लक्ष्मी घुगरे, रूपाली परीट, सावित्री पाटील आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com