बावड्यात अवतरल्या कोल्हापुरच्या सुंदरी

buffalo competition in Kolhapur
buffalo competition in Kolhapur

कोल्हापूर : लांबलचक शिंग, रंगवलेल्या शिंगांवर रूबाबदार तुरे, इतकच नाही तर पायात चांदीचे तोडे आणि अंगावर गुलाल असलेल्या सुंदरींनी कोल्हापुरातील बावडा परिसर आज (शुक्रवार) बहरून गेला होता, या सुंदरीना पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनीही मोठी गर्दी केली होती.

पाडव्याच्या मुहुर्तावर कोल्हापूरच्या या सुंदऱ्या रस्त्यावर उतरल्या. गौरा, राधा, सुंदरी, यासह अनेक सुंदरी बावडा परिसरात जमल्या. या म्हशी आपल्या मालका शेजारी तोऱ्यात उभ्या होत्या.दरवर्षी दिवाळी पाडव्याला कसबा बावडा परिसरात म्हशींच्या विविध स्पर्धा घेतल्या जातात. याच स्पर्धांसाठी जिल्ह्यातील शंभरहून अधिक म्हशी सहभागी झाल्या होत्या.

स्पर्धेत म्हशींसाठी खास खेळ आयोजित केले होते. शिट्टी वाजवून म्हशीला पळवणे, हलगीच्या तालावर म्हशींचा नाच आणि याहून मजेशीर म्हणजे गर्दीत मालकाच्या शिट्टीच्या आवाजानं म्हशीनं आपल्या मालकाला ओळखणे अशा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रमाने बावडा परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com