हार न मानणारा चंद्रहार

संदीप खांडेकर
मंगळवार, 29 ऑगस्ट 2017

शस्त्रक्रिया होऊनही ‘महाराष्ट्र केसरी’साठी पुन्हा शड्डू
कोल्हापूर - ‘बचेंगे तो और भी लडेंगे’ हे वाक्‍य पानिपतच्या युद्धात दत्ताजी शिंदे यांनी उद्‌गारले आणि ते अजरामर झाले. अंगात रग असेल, तर मराठी माणूस कधीच खचत नाही, याची प्रचिती त्यांच्या वाक्‍यातून आजही येते.

तोच वारसा डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील पुढे चालवतो आहे. कधी मांडी, कधी गुडघा, तर कधी खांद्यावर शस्त्रक्रिया होऊनसुद्धा आता पुन्हा चंद्रहारने ‘महाराष्ट्र केसरी’ किताबाच्या तयारीसाठी शड्डू ठोकला आहे.

राष्ट्रकुल कुस्ती संकुलात त्याचा कुस्तीचा सराव पुन्हा सुरू झाला आहे. 
सांगली जिल्ह्याकडून मैदानात उतरणाऱ्या चंद्रहारची कोल्हापूर ही कर्मभूमी आहे. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते राम सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली मॅटवरच्या कुस्तीतील डावपेच आत्मसात करत त्याने २००७-०८ला पहिल्यांदा महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. या यशाने भारावून न जाता त्याने डबल महाराष्ट्र केसरीसाठी तयारी सुरू केली. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा २००८-०९ला त्याला ही गदा जिंकण्यात यश आले. तिसऱ्यांदा गदा मिळविण्याची इच्छा बाळगून तो २००९ला मैदानात उतरला; पण मांडीच्या दुखापतीने त्याला यश मिळविता आले नाही. २०१०ला त्याच्या मांडीची शस्त्रक्रिया झाली. तो २०११ला मैदानात उतरला. मात्र त्याला हार पत्करावी लागली. त्यानंतर २०१२ला त्याच्या गुडघ्याची, तर २०१३ला पुन्हा मांडीची शस्त्रक्रिया झाली. त्याने २०१५ला मैदानात उतरून नशीब आजमाविण्याचा केलेला प्रयत्न असफल ठरला. तो २०१४ व २०१६ला मैदानात उतरलाच नाही.

चंद्रहार आता पुन्हा कुस्तीच्या तयारीत व्यस्त झाला आहे. गुरुवर्य श्री. सारंग यांच्या संकुलात तो गेली चार-पाच महिने सराव करतो आहे. पहाटे पाच ते सात, सकाळी नऊ ते अकरा, दुपारी चार ते सहा ही त्याच्या सरावाची वेळ आहे. तीन वर्षांपूर्वी विवाहित झालेल्या चंद्रहारला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होणाऱ्या प्रो-रेसलिंगची उत्सुकता आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने ही स्पर्धा होणार असून, एका संघात चार पुरुष व दोन महिला कुस्तीपटूंचा समावेश असणार आहे. त्यामुळे या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळाली तर त्याचे सोने करण्याच्या विचारात तो आहे. तीन वेळा महाराष्ट्र केसरीची गदा मिळविणे हे आपले ध्येय असल्याचे तो सांगतो.

चंद्रहारचा रोजचा सराव सहा तासांचा आहे. त्यात तो कोणतीही तडजोड करत नाही. महाराष्ट्र केसरी, हिंदकेसरी गदा मिळविण्यावर त्याने लक्ष केंद्रित केले आहे. 
- राम सारंग, राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते