शालिनी सिनेटोनच्या जागेवर चित्रपट महामंडळाचा फलक 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

कोल्हापूर - शालिनी सिनेटोनची जागा खासगी बिल्डरकडून हडप करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे शालिनी सिनेटोनच्या जागेचा वापर चित्रीकरणासाठीच व्हावा, यासाठी आता अखिल भारतीय चित्रपट महामंडळ कलाकार संघटना व विविध संस्था, संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून आज स्टुडिओ परिसरात फलक उभारण्यात आला आणि महापौर हसीना फरास यांना निवेदन देण्यात आले. उद्या (ता. 28) दुपारी चार वाजता महापालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांच्याशी या विषयावर चर्चा केली जाणार आहे. 

शालिनी सिनेटोन परिसराच्या 47 एकर जागेपैकी, त्यातील 5 व 6 क्रमांकाचे भूखंड आहेत. ही जागा शालिनी सिनेटोनसाठी राखीव आहे. तसेच तुकोजीराव कृष्णरावजी पवार महाराज ऑफ देवास यांनी ही जागा शालिनी सिनेटोनसाठी राखीव ठेवली आहे. त्याची कागदपत्रे महामंडळाकडे आहेत. मात्र, ही जागा हडप करण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याचे महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. या वेळी ज्येष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, माजी अध्यक्ष यशवंत भालकर यांच्यासह उपाध्यक्ष धनाजी यमकर, कार्यवाह रणजित जाधव, माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर, विजय शिंदे, अशोक माने, अवधूत जोशी, सतीश बिडकर, शरद चव्हाण, आकाराम पाटील, शुभांगी साळोखे, अशोक जाधव, अर्जुन नलवडे, सुरेंद्र पन्हाळकर, अरुण चोपदार, संतोष शिंदे, सागर बगाडे, संग्राम भालकर, महामंडळाचे व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर आदी उपस्थित होते.