साडविलकरांविरोधात तक्रार अर्ज दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 नोव्हेंबर 2017

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदार संजय साडविलकर यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात संशयित समीर गायकवाडने तक्रार अर्ज दिला. 

कोल्हापूर - ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदार संजय साडविलकर यांच्याविरोधात जुना राजवाडा पोलिस ठाण्यात संशयित समीर गायकवाडने तक्रार अर्ज दिला. 

पानसरे व दाभोलकर या दोन्ही हत्या प्रकरणात साडविलकर यांनी साक्षीदार म्हणून जबाब देताना उदरनिर्वाहचे कोणतेही साधन नसल्याने १९८५ ते १९८८ या काळात गावठी पिस्तूल व रिव्हाॅल्व्हर विक्री व दुरुस्तीचे काम करत असल्याचे म्हटले आहे. समीरला डॉ. तावडे याच्या विरोधात दाखल केलेल्या दोषारोप पत्रातून ही माहिती मिळाली. त्यानुसार साडविलकरने शस्त्रे कोणाकोणाला विकली, त्यातून कोणी कोणी गुन्हे केले, याचा तपास व्हावा, या मागणीचा तक्रार अर्ज समीर गायकवाडने जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर यांना दिला. 

याचवेळी पोलिस अधीक्षक संजय मोहिते पोलिस ठाण्यात आले. शिष्टमंडळाने तक्रार अर्जाबाबत त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी ॲड. समीर पटवर्धन, किशोर घाटगे, सुनील पाटील, शिवानंद स्वामी, मधुकर नाझरे, सुदर्शन भोसले, सुधाकर सुतार, सागर मिरजकर आदी उपस्थित होते. 

एसआयटीकडून अर्जाची चौकशी
जुना राजवाडा ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर म्हणाले, ‘‘पानसरे हत्येचा तपास एसआयटीकडून सुरू आहे. त्यामुळे दाखल झालेल्या तक्रार अर्जाची चौकशीही एसआयटीकडून केली जाईल. तातडीने तो अर्ज विभागाकडे पाठविण्यात येईल.’’

Web Title: Kolhapur News complain against Sadvilkar