शिरोळ तालुक्यातील शेततळ्यात सहा फुटी मगर 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

शिरोळ - कनवाड (ता. शिरोळ) येथील शेततळ्यात तब्बल सहा फुट लांबीची मगर आढळल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत. जयसिंगपूरच्या वाइल्ड लाईन कंझरवेशन रेस्क्‍यु सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी मगरीला पकडून वनविभागाच्या ताब्यात दिले. 

कनवाड येथील बनवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याच्याजवळ प्रवीण पाटील यांचे शेततळे आहे. शेततळ्यात आज दुपारी पाटील यांना मगर दिसली. ही बातमी परिसरात पसरताच मगरीस पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. प्रविण पाटील यांनी जयसिंगपूरच्या वाईल्ड लाईन कंझरवेशन रेस्क्‍यु सोसायटीच्या कार्यकर्त्यांना दूरध्वनीवरून मगरीबाबत माहिती दिली. 

रेस्क्‍यु सोसायटीचे अभिजित खामकर, सिद्धार्थ बेग, दिलीप कांबळे, अक्षय पाटील, ए. के. सुतार, देवेंद्र कोळी, गणेश जाधव, संतोष कुंभार, रितेश राजेशिर्के आदी घटनास्थळी पोहोचले. रेस्क्‍यु सोसायटीच्या कार्यकर्त्यांनी मगरीस पकडुन, रात्री वन विभागाच्या ताब्यात दिले. 

कृष्णेत वावर 
पाटील यांचे शेततळे कृष्णा नदीपासून दीड किलोमीटर अंतरावर आहे. कृष्णा नदी पात्रातून, ही मगर शेततळ्यात आल्याची, चर्चा ग्रामस्थांमधून व्यक्‍त केली जात आहे.