इचलकरंजीतील अनुभव भविष्यात उपयुक्त - रसाळ 

पंडित कोंडेकर
बुधवार, 13 जून 2018

इचलकरंजी - ""पालिकेच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाज करतांना इचलकरंजी शहराशी माझे भावनिक नाते निर्माण झाले आहे. या ठिकाणी मिळालेला मोठा अनुभव मला पुढील काळात नक्कीच उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया इचलकरंजी पालिकेचे मावळते मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी व्यक्त केली. 

इचलकरंजी - ""पालिकेच्या माध्यमातून प्रशासकीय कामकाज करतांना इचलकरंजी शहराशी माझे भावनिक नाते निर्माण झाले आहे. या ठिकाणी मिळालेला मोठा अनुभव मला पुढील काळात नक्कीच उपयुक्त ठरेल, अशी प्रतिक्रिया इचलकरंजी पालिकेचे मावळते मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी व्यक्त केली. 

डॉ.रसाळ यांची पनवेल महापालिकेच्या अतिरीक्त आयुक्तपदी बदली झाली. तर दीपक पाटील आज पालिकेचे नवे मुख्याधिकारी म्हणून रुजू झाले. पालिका सभागृहात डॉ.रसाळ यांचा निरोप समारंभ तर श्री.पाटील यांचा स्वागत समारंभ पार पडला. यावेळी या दोन्ही अधिकाऱ्यांचा सत्कार नगराध्यक्षा अलका स्वामी यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी सत्काराला उत्तर देतांना डॉ.रसाळ यांनी आपणास इचलकंरजी शहराने पूर्नजन्म दिला असून हे शहर नेहमीच आपल्या स्मरणात राहिल, असे यावेळी सांगितले. नूतन मुख्याधिकारी पाटील यांनी इचलकंरजीतील अपुरी सेवा पूर्ण करण्याची संधी शासनाने पून्हा एकदा मला दिली असून नागरिकांच्या अपेक्षा आपण नक्की पूर्ण करण्यात येतील, असा विश्‍वास व्यक्त केला.

भाजपचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी स्वागत केले. जेष्ठ नगरसेवक अजितमामा जाधव, शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे, रवींद्र माने, उदयसिंह पाटील, सागर चाळके, शामगोंडा पाटील, माजी आमदार अशोकराव जांभळे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपनगराध्यक्षा सरीता आवळे, अब्राहम आवळे, राहूल खंजीरे, मनोज हिंगमीरे, रवी लोहार, किसन शिंदे, इक्‍बाल कलावंत, नगरसेविका ध्रुवती दळवाई, शुभांगी माळी, संध्या बनसोडे आदी उपस्थीत होते.

मुख्याधिकारी रसाळ यांची भरीव कामे

  • होर्डिंग्जमुक्त शहर
  • "बीव्हीजी"च्या माध्यमातून स्वच्छता
  • काळा ओढ्याची स्वच्छता
  • शासनाकडून भरीव निधी
  • वारणा योजनेचा पाठपुरावा
  • घनकचरा प्रकल्पाची मंजुरी
  • जादा दराच्या निविदांना ब्रेक
Web Title: Kolhapur News Dr Prashant Rasal comment