कोल्हापूर उत्तरमध्ये अडीच हजार दुबार मतदार

कोल्हापूर उत्तरमध्ये अडीच हजार दुबार मतदार

कोल्हापूर - कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील सुमारे अडीच हजार दुबार मतदारांची नावे रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. एकाच पत्त्यावर नोंदणी, मृत आणि स्थलांतरित असे निकष लावून दुबार नोंदणी रद्द होणार आहे. २०१९ ची विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून प्रक्रिया सुरू झाली. ज्याचे नाव दुबार आहे, त्यास कागदपत्रांसह पुरावे सादर करण्याची नोटीस बजावली. त्यास उत्तर न दिल्यास मतदार यादीतून आपोआप रद्द होईल.

जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांची सरासरी मतदारसंख्या सुमारे अडीच लाखांच्या घरात आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात ६० प्रभागांचा समावेश होतो. उर्वरित २१ प्रभाग कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात येतात. मतदारांची संख्या सुमारे अडीच लाखांच्या घरात आहे. निवडणूक विभागाला प्रत्येक प्रभागात किमान ४० ते ५० नावे दुबार असल्याचे निदर्शनास आले. ६० प्रभागांचा विचार करता ही संख्या सुमारे अडीच हजारांच्या घरात आहे. 

संबंधित मतदाराचे नाव एकच, पण पत्ता वेगळा अशी स्थिती आहे. जे मतदार शहरातून स्थलांतरित झाले, त्यांचा मतदार यादीत समावेश आहे. ज्यांचा मृत्यू झाला, अशांचीही नावे यादीत आहेत. २०१९ ला विधानसभेची निवडणूक होत आहे. मतदार यादी अधिक अपडेट व्हावी, असेच निवडणूक आयोगाचे 
प्रयत्न आहेत. 

निवडणूक लोकसभेची असो, विधानसभेची, महापालिका, नगरपालिका अथवा ग्रामपंचायतीची, राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना निवडणूक जवळ आली की मतदार यादीची आठवण होते. गावनिहाय मतदार यादीची छाननी सुरू होते. निवडणूक आयोगाने मतदान स्लिप त्यांच्याकडून वितरित करण्याचे काम सुरू केले.

पूर्वी राजकीय नेत्यांचे काम कार्यकर्ते करत होते. प्रत्येक निवडणुकीवेळी बोगस मतदानाच्या तक्रारी होतात. एखाद्या मतदाराचा मृत्यू झाला असताना त्याच्या जागी दुसरा उभा करून मतदान केले. दुसऱ्याच विघानसभा हद्दीतील मतदार आहेत, असा तक्रारींचा सूर असतो. 

दुबार मतदारांना नोटिसा
मतदानादिवशी घोळ होऊ नये. जो मतदार एखाद्या पत्त्यावर वास्तव्यास आहे, तेथेच त्याची नोंद व्हावी यासाठी दुबार नोंदणी रद्द करण्याचे काम सुरू आहे. संबंधित मतदाराने रहिवासी पुरावे सादर केले की दुसऱ्या पत्त्यावरील नाव रद्द होईल. अनेक मतदारांना नावाची एकदा नोंद असताना दुबार झाली कशी, केवळ नावात साधर्म्य आहे म्हणून मन:स्ताप कशासाठी असा प्रश्‍न पडला आहे. दुबार मतदारांना नोटिसा बजावल्या जात आहेत. त्यास विशिष्ट मुदतीत उत्तर न दिल्यास मतदार यादीतून नाव कमी होऊ शकते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com