भुदरगड तालुक्यात वीजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

भुदरगड तालुक्यात वीजेच्या धक्क्याने कामगाराचा मृत्यू

गारगोटी - नितवडे (ता. भुदरगड) येथे विजेच्या धक्क्याने कंत्राटी कामगार संदीप दिलीप पाटील (वय 24, रा. एरंडपे) यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची पोलिसात नोंद झाली.

याबाबतची फिर्याद सर्जेराव पाटील (रा. एरंडपे) यांनी पोलिसात दिली. पोलिसांनी सांगितले की, एरंडपे येथील संदीप पाटील हा महावितरण कंपनीमध्ये कंत्राटी कामगार म्हणून सहा महिन्यांपूर्वी रुजू झाला होता. त्याची नेमणूक कडगाव विभागाकडे झाली होती. आज सकाळी तो शेतीला वीज पुरवठा करणाऱ्या नादुरुस्त रोहित्राची (डीपी) दुरुस्ती करीत होता. त्यावेळी विजेचा धक्का बसला. त्याला उपचारासाठी गारगोटी ग्रामीण रुग्णालयात आणले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com