कोल्हापूरच्या 3000 वकिलांचा शेतकऱयांच्या राज्यव्यापी बंदला पाठिंबा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

आज न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहिले वकील 

बळीराजाच्या आंदोलनाकडे शासनाकडून करण्यात येणारी बेदखल पद्धत अन्यायकारक आहे अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित वकीलांनी व्यक्त केली.

कोल्हापूर : कर्जमुक्तीच्या मागणीसाठी राज्यातील विविध शेतकरी संघटनानी पुकारलेल्या  राज्यव्यापी बंदला पाठींबा म्हणुन कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनने आज न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहण्याचा निर्णय घेतला.  त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील 3000 वकिल न्यायालयीन कामकाजापासून अलिप्त राहिले.

विशेष म्हणजे न्यायालयाच्या एक महिन्याच्या उन्हाळी सुट्टी नंतर कामकाजाचा आज पहिला दिवस होता. सहा जिल्हयामार्फत चालविण्यात येणारया कोल्हापूरच्या खंडपीठ मागणीसाठीच्या आंदोलनात शेतकरी संघटना नेहमी अग्रेसर राहिल्या आहेत. बळीराजाच्या आंदोलनाकडे शासनाकडून करण्यात येणारी बेदखल पद्धत अन्यायकारक आहे अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित वकीलांनी व्यक्त केली.

यापूर्वीही शेतकरी संघटनेच्या वेळोवेळी झालेल्या आंदोलनामध्ये कार्यकर्त्यांवर करण्यात आलेल्या  खटल्यांचे काम  कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे मोफत चालविणेत आले आहे. आज झालेल्या विशेष  बैठकीच्या अध्यक्षस्थानी बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.प्रकाश मोरे होते. यावेळी अॅड.प्रशांत चिटणीस, अॅड.व्हि.आर.पाटील, अॅड.प्रकाश हिलगे आदींनी आपले  मत व्यक्त केले. बैठकीत अॅड.राजेंद्र मेहता, अभिजीत कापसे, पी.आर.पाटील, अशोक पाटील, विवेक घाटगे, विलासराव दळवी, रणजित गावडे,पी.जे.पाटील, नामदेव हातकर, चारूलता चव्हाण आदी वकिल हजर होते....