गोल सर्कल मंडळाला सर्वतोपरी सहकार्य 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

कोल्हापूर - रंकाळावेस गोल सर्कल मित्र मंडळाला सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्‍वासन पालकमंत्री तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. गोल सर्कल मित्रमंडळाच्या "कोल्हापूरचा राजा' ही गणेश मूर्ती आजपासून पाहण्यासाठी खुली करण्यात आली. या कार्यक्रमप्रसंगी पाटील बोलत होते. 

गोल सर्कल मंडळाने समाजात नेहमीच वेगळे उपक्रम राबवून ठसा निर्माण केला आहे. यंदाच्या वर्षी मंडळाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. संपूर्ण गणेश मंडळात सुरक्षा ठेवण्यासाठी हे उपक्रम राबविले आहेत. तसेच मंडळातर्फे नेहमीच हार-तुरे, बुकेऐवजी रोपटे देऊन मान्यवरांचा सत्कार करता येतो. आजही पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांचा सत्कारही रोपटे देऊन केला. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. 

मंडळाच्या विविध समाजोपयोगी उपक्रमाची आपल्यालाही माहिती आहे. मंडळासाठी वास्तुची गरज आहे; पण सध्या मंडळाकडे जागा नाही; पण या मंडळाची वास्तू होण्यासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल जाधव यांचा पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला. या वेळी नगरसेवक प्रताप जाधव, तौफिक मुल्लाणी तसेच मंडळाचे अध्यक्ष सचिन पाटील आदी उपस्थित होते. 

दरम्यान, कार्यक्रमस्थळी खासदार धनंजय महाडिक, खासदार संभाजीराजे, आमदार सतेज पाटील, आमदार राजेश क्षीरसागर यांनीही भेट देऊन कार्यकर्त्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.