स्वच्छता मोहिमेतून 52 टन कचरा संकलित 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

कोल्हापूर -  "सकाळ' माध्यम समूह आणि महापालिकेच्या पुढाकाराने आज "चला, जपूया मातीचा वारसा' या स्वच्छता मोहिमेतून 52 टन कचरा संकलित झाला. शहरातील प्रातिनिधिक 22 वारसास्थळांची स्वच्छता करण्यासाठी सारे कोल्हापूर एकवटले. सकाळी सात ते नऊ या वेळेत एकाच वेळी ही मोहीम झाली. त्यानंतर ऐतिहासिक भवानी मंडपात मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत मोहिमेची सांगता झाली. दरम्यान, शहरातील वारसास्थळांच्या जतन व संवर्धनासाठी आवश्‍यक सर्वतोपरी सहकार्याची ग्वाही या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. आमदार सतेज पाटील यांनी पाच लाखांचा निधी या वेळी जाहीर केला. 

"सकाळ'ने गेल्या नऊ वर्षांपासून शहरातील विविध पर्यावरणीय प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी लोकसहभागातून कृती कार्यक्रमांवर भर दिला आहे. "चला, रंकाळा वाचवूया', "चला, झाडे लावूया', "चला, पंचगंगा वाचवूया' आदी मोहिमा हाती घेतल्या आणि त्या आता यशस्वीतेच्या टप्प्यावर आल्या असतानाच "चला, जपूया मातीचा वारसा' ही मोहीम हाती घेतली आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून स्वच्छता मोहीम झाली. दरम्यान, "सकाळ' माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी मोहिमेचा उद्देश आणि "सकाळ' माध्यम समूहाची भूमिका स्पष्ट केली. 

रोजा अन्‌ व्हॉट्‌सऍप ग्रुप... 
22 पैकी सात ते आठ वारसास्थळांच्या परिसरात मद्याच्या आणि प्लॅस्टिकच्या बाटल्यांचा खच मोठ्या प्रमाणावर आढळला. एकूण 19 टन प्लॅस्टिक आणि 33 टन काचेच्या बाटल्या या मोहिमेतून संकलित झाल्या. दरम्यान, मुस्लिम बांधवांचाही मोठा सहभाग या मोहिमेत राहिला. रमजानचे रोजे असूनही या मोहिमेत ते सक्रिय झाले. विविध वारसास्थळांवर एकवटलेल्या सेवाभावी व्यक्ती आणि संस्थांच्या पुढाकाराने आता त्या त्या वारसास्थळांच्या सातत्यपूर्ण स्वच्छतेसाठी व्हॉट्‌सऍप ग्रुप तयार झाले असून, महिन्यातून एकदा या ग्रुपमार्फत स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे.