उत्तूरमध्ये निकराची; बहिरेवाडी, भादवणमध्ये अटीतटीची

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 ऑक्टोबर 2017

आजरा - आजरा तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणूक लागलेल्या उत्तूर, बहिरेवाडी व भादवण येथे प्रतिष्ठेच्या लढती होणार आहेत. उत्तूरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी, जनता दल, भाजप एकत्र आल्यामुळे येथे निकराची झुंज पाहायला मिळेल. बहिरेवाडी, भादवणमध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्‍यता आहे.

आजरा - आजरा तालुक्‍यात ग्रामपंचायत निवडणूक लागलेल्या उत्तूर, बहिरेवाडी व भादवण येथे प्रतिष्ठेच्या लढती होणार आहेत. उत्तूरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष उमेश आपटे यांच्या विरोधात राष्ट्रवादी, जनता दल, भाजप एकत्र आल्यामुळे येथे निकराची झुंज पाहायला मिळेल. बहिरेवाडी, भादवणमध्ये अटीतटीचा सामना होण्याची शक्‍यता आहे.

गत वेळी शाहू आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या विरोधात उत्तूर ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवणाऱ्या शाहू आघाडीमध्ये या तीनचार वर्षांत झालेल्या राजकीय घडामोडींमुळे फूट पडली आहे. या आघाडीतून बाहेर पडलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष व विद्यमान सदस्य उमेश आपटे यांना रोखण्यासाठी विरोधात राष्ट्रवादी, जनता दल, भाजप यांनी मोट बांधली आहे.

येथील लढतीकडे जिल्ह्याचे लक्ष वेधले आहे. बहिरेवाडी येथे गोविंद सावंत मामा व विरोधात भाचा अनिल चव्हाण आमनेसामने आले आहेत. धामणे येथे तिरंगी लढत होणार आहे. भादवणमध्ये शिवसेना, भाजप व काँग्रेस राष्ट्रवादी असा तिहेरी सामना होत आहे. काही अपक्ष मैदानात आहेत; पण खरी लढत या तीन आघाड्यांत आहे.

येथे सरपंचपदासाठी चुरशीची लढत होत आहे. होन्याळीत पूर्वाश्रमीचे शिष्य-गुरु यांच्यात यंदा ही ग्रामपंचायतीसाठी झुंज होणार आहे. पेंढारवाडीत राष्ट्रवादीच्या घरातच फूट पडली आहे. मुश्रीफांना मानणारे दोन गट एकमेकांविरोधात आहेत. आरदाळमध्ये राष्ट्रवादीच्या विरोधात सर्व गट एकवटले आहेत. वडकशिवाले येथे राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपने शड्डू ठोकला आहे. कोरीवडे व साळगाव येथे राष्ट्रवादीच्या विरोधात विरोधकांनी आघाडी केली असून शिवसेना, भाजप व स्थानिक राजकीय गट एकत्रित आले आहेत.

होन्याळीत गुरू-शिष्यांत लढत
होन्याळी ग्रामपंचायतीसाठी पूर्वाश्रमीचे गुरू-शिष्य असलेली जोडी यंदाही पंचवार्षिकला एकमेकांच्या विरोधात ठाकली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य काशिनाथ तेली या गुरूच्या विरोधात शिष्य विद्यमान सरपंच सागर सरोळकर पुन्हा मत अजमावणार आहेत.

Web Title: kolhapur news Grampanchayat Election