कागल तालुक्‍यात मुश्रीफ गटाची बॅटींग 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

कागल तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ गटाने सर्वाधिक दहा ठिकाणी सत्ता मिळविली, प्रा. संजय मंडलिक गटाला सात ठिकाणी, माजी आमदार संजय घाटगे गटाला चार व समरजितसिंह घाटगे गटाला तीन ठिकाणी सत्ता मिळाली.

कागल/म्हाकवे - कागल तालुक्‍यातील 26 ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदाच्या निवडणुकीत आमदार हसन मुश्रीफ गटाने सर्वाधिक दहा ठिकाणी सत्ता मिळविली, प्रा. संजय मंडलिक गटाला सात ठिकाणी, माजी आमदार संजय घाटगे गटाला चार व समरजितसिंह घाटगे गटाला तीन ठिकाणी सत्ता मिळाली. तर नंद्याळमध्ये अपक्ष उमेदवार राजश्री दयानंद पाटील यांनी बाजी मारली तर ठाणेवाडी येथे प्रविणसिंह पाटील गटाला सत्ता मिळाली. एकंदर तालुक्‍यात मुश्रीफ, मंडलिक गटाने मोठी मुसंडी मारल्याचे चित्र आहे. तालुक्‍यात एकूण 15 ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर झाले. 

थेट सरपंच म्हणून विजयी झालेले उमेदवार -

फराकटेवाडी - शीतल रोहित फराकटे (बिनविरोध), हणबरवाडी - प्रभाकर शंकर मेथे, दौलतवाडी - विठ्ठल रमेश जाधव, करड्याळ - विठ्ठल दिनकर टिपुगडे, अवचितवाडी - उत्तम हरी पाटील, ठाणेवाडी - अरुण यमगेकर, हसुर बुा -दिग्विजय पाटील, नंद्याळ - राजश्री दयानंद पाटील, बामणी - रावसाहेब बाळू पाटील, बाळेघोल - सावित्री शिरसाप्पा खतकल्ले, बेलेवाडी काळम्मा - सागर यशवंत पाटील, पिराचीवाडी - सुभाष पांडूरंग भोसले, निढोरी - देवानंद पाटील, मुगळी - कृष्णात काळू गुरव, जैन्याळ - हौसाबाई तुकाराम बरकाळे, व्हनाळी - निलम सुरेश मर्दाने, रणदेवीवाडी - शोभा खोत, अर्जूनवाडा - प्रदिप पाटील, बोळावी - आनंदा धोंडीराम पाटील, बाचणी - निवास पाटील, चिमगाव - रुपाली दिपक अंगज, आणूर - रेखा आनंदा तोडकर, हमिदवाडा - सूमन विलास जाधव, बोरवडे - गणपतराव फराकटे, कापशी सेनापती व बाळीक्रे - श्रध्दा सतीश कोळी, कसबा सांगाव - रणजित कांबळे. 

पिराचीवाडी येथे पांडूरंग रामा मस्कर व संजय दौलती भोसले यांना समान मते पडली.चिठ्ठीवर मुश्रीफ गटाचे मस्कर हे विजयी झाले. तर मुगळी येथे विठाबाई सांगले व मालूबाई चेचर यांना समान मते पडली.यामध्ये मंडलिक गटाच्या विठाबाई सांगले विजयी झाल्या. 

मुश्रीफ गटाला फराकटेवाडी, दौलतवाडी, करड्याळ, बामणी, बाळेघोल, बेलेवाडी काळम्मा, पिराचीवाडी, निढोरी, बोरवडे, कसबा सांगाव, मंडलिक गटाला अवचितवाडी, हसुर बुा, मुगळी, हमिदवाडा, चिमगाव, बाचणी, आणूर, संजय घाटगे गटाला व्हनाळी,सेनापती कापशी, अर्जूनवाडा, रणदेवीवाडी, समरजितसिंह घाटगे गटाला हणबरवाडी, जैन्याळ, बोळावी, प्रविणसिंह पाटील गटाला ठाणेवाडी व नंद्याळ येथे अपक्ष उमेदवार राजश्री दयानंद पाटील यांना सरपंचपद मिळाले. 

सत्तांतर झालेली गावे 
हणबरवाडी, करड्याळ, हसुर बुा, नंद्याळ, बेलेवाडी काळम्मा, मुगळी, जैन्याळ, सेनापती कापशी, अर्जूनवाडा, बामणी, पिराचीवाडी, निढोरी, रणदेवीवाडी, अर्जुनवाडा, बाचणी या गावात सत्तांतर झाले.