करवीर तालुक्यात काँग्रेस, भाजपची पीछेहाट

करवीर तालुक्यात काँग्रेस, भाजपची पीछेहाट

कोल्हापूर - आतापर्यंत जाहीर झालेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालमध्ये करवीर तालुक्यामध्ये सरपंचपदाच्या १५ निकालापैकी ९ जागांवर कॉंग्रेसने बाजी मारली आहे. शिवसेना ३ जागांवर तर २ जागांवर भाजपने विजय मिळविला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदरात १ जागा पडली आहे. 

कॉंग्रेसने शेळकेवाडीतून रंगराव बाबूराव शेळके यांनी ३ मतांनी विजय मिळवला आहे. भाटणवाडी अमर आनंदा कांबळे, पासार्डे वंदना अशोक चौगले, हणबरवाडीतून सुप्रिया बाजीराव वाडकर यांनी बाजी मारली आहे, तर सडोली दुमालातून च्या मनोहर कांबळे, सोनाळीतून मोहन बळवंत पाटील, आणि कांडगाव मधून रुपाली बाळासो मेडसिंगे, म्हाळुंगेच्या पार्वती ईश्वरा चौगुले, कंदलगावमध्ये अर्चना साहिल पाटील यांनी बाजी मारली आहे.
भाजपने कावणेतून सुनील टिपुगडे आणि सादळे-मादळेतून मिनाक्षी विजय जाधव यांनी विजय मिळविला. शिवसेनेच्या उमा संभाजी पचिंद्रे यांनी प्रयाग-चिखलीतून, सावर्डे दुमालातून सुवर्णा कुंडलिक कारंडे तर नंदवाळमधून अस्मिता युवराज कांबळे यांनी बाजी मारली आहे. राष्ट्रवादीला परितेतून अक्काताई सुदाम कारंडे ही जागा मिळाली आहे. आरळेतून सर्वपक्षीय आघाडीचे ईश्वरा शामराव कांबळे यांनी बाजी मारली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील आत्तापर्यंतचा  सरपंच निवडीचा उपलब्ध निकाल असा -

करवीर तालुका विजयी सरपंच

कावणे- सुनिल टिपुगडे (भाजप), हणबरवाडी - सुप्रिया वाडकर (काँग्रेस), पासार्डे- वंदना चाैगले (काँग्रेस), भाटणवाडी - अमर कांबळे (स्थानिक आघाडी), सोनाळी मोहन पाटील (काँग्रेस), कंदलगाव - अर्चना पाटील (काँग्रेस), म्हाळुंगे- पार्वती चाैगले (काँग्रेस), शिरोली दुमाला - छाया कांबळे (काॅंग्रेस), कंडगाव- रुपाली मेडशिंगे (काँग्रेस), आरळे - ईश्वरा कांबळे

भुदरगड तालुका विजयी सरपंच

पुष्पनगर - आर. बी. देसाई (राष्ट्रवादी), पिंपळगाव - विश्वनाथ कुंभार (राष्ट्रवादी) , मडिलगे खुर्द - गाैरी खापरे, (राष्ट्रवादी),व्हनगुत्ती-श्रीकांत कांबळे,कारीवडे-ज्ञानदेव देसाई (जाधव गट),आरळगुंडी-आक्काताई देवेकर(शिवसेना)

राधानगरी तालुका विजयी सरंपच -

राशिवडे - कृष्णात पाेवार (राष्ट्रवादी), पडळी - रूपाली पाटील (राष्ट्रवादी), सुळंबी-सुवर्णा बरगे(राष्ट्रवादी), पिरळ-मारूती चाैगले-(राष्ट्रवादी), बनाचीवाडी-रेश्मा पाटील (राष्ट्रवादी), करंजफेण-स्वाती कांबळे (काँग्रेस), भाटलेखुर्द-आनंदा पाटील(काँग्रेस),आकनूर-उल्हास पाटील (राष्ट्रवादी), दुर्गमनवाड-युवराज गुरव-(राष्ट्रवादी), पाटपन्हाळा-शंकर पाटील (राष्ट्रवादी), कोते-अनिता पाटील (स्थानिक आघाडी), घुडेवाडी- डाँ. विलास तरावणे (शिवसेना), आवळी बुद्रुक-सर्जेराव कवडे (काँग्रेस), मजरे कासारवाडा - बाबुराव जाधव (राष्ट्रवादी)


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com