अपंगांसाठीच्या सव्वाशे केबिन धूळ खात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 10 सप्टेंबर 2017

कोल्हापूर - नगरसेवकांनी दमदाटी करून बसविलेल्या केबिनला अभय आणि अपंगांना जेथे उद्योग व्यवसाय होऊ शकत नाही, अशी जागा या न्यायामुळे शहरात सव्वाशेहून अधिक केबिन सध्या धूळ खात पडून आहेत. १७३ पैकी ५० केबिनचाच जेमतेम वापर सुरू आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बजेटमधून तीन टक्के निधी हा अपंगांसाठी खर्च होणे बंधनकारक आहे. महापालिकेने असा निधी खर्च केला हे दाखविण्यासाठी निळ्या रंगाच्या १७३ केबिन तयार केल्या. एका केबिनसाठी २८ हजारांचा खर्च केल्याचे सांगितले जाते. मात्र केबिनच्या पत्र्याचा दर्जा पाहता खरंच २८ हजारांचा खर्च आला का, अशी स्थिती आहे. 

हुतात्मा पार्क, सायबर चौक, टेंबलाई परिसरात त्रिशक्ती चौक, शहाजी महाविद्यालयासमोर, फुलेवाडी, शेंडापार्क, राजेंद्रनगर, शिवाजी टेक्‍निकल इन्स्टिट्यूट मागील बाजू येथे केबिन बसविल्या आहेत. ज्या जागा आहेत एकतरी तेथे चिटपाखरू फिरकत नाही आणि काही जागांवर कमालीची अस्वच्छता आहे. 

अपंग बांधवांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे त्यांची परवड होऊ नये, या उद्देशाने छोट्या मोठ्या व्यवसायांसाठी केबिन तयार केल्या गेल्या. 

एखाद्या कामाचे नियोजन नसले की बोजवारा कसा उडतो याचे उत्तम उदाहरण म्हणून केबिनकडे पाहिले पाहिजे. काही नगरसेवकांचा केबिन लावण्यास विरोध आहे. अपंग बांधवांनी न्याय मागायचा कुणाकडे, अशी स्थिती आहे. १७३ पैकी १२५ केबिन वापराविना पडून आहेत. आमच्याही काही अपंग बांधवांनी अमुक एक जागा मिळाली पाहिजे हा हट्ट सोडायला हवा. केबिनप्रश्‍नी प्रशासनाने तोडगा काढावा; अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही.

- देवदत्त माने, जिल्हाध्यक्ष, प्रहार संघटना