वातावरणातील बदलामुळे ढगफुटीसदृश पाऊस ः प्रा. जोशी 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

कोल्हापूर -  ‘हवेचे प्रदूषण, वातावरणातील बदल यांमुळे संपूर्ण ऋतुचक्र बिघडले आहे. बिघडलेल्या वातावरणामुळेच कोल्हापुरात बुधवारी मध्यरात्री ढगफुटीसारखा पाऊस पडला,’ अशी माहिती केआयटीच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे प्रा. सौरभ जोशी यांनी ‘सकाळ’ला दिली.

कोल्हापूर -  ‘हवेचे प्रदूषण, वातावरणातील बदल यांमुळे संपूर्ण ऋतुचक्र बिघडले आहे. बिघडलेल्या वातावरणामुळेच कोल्हापुरात बुधवारी मध्यरात्री ढगफुटीसारखा पाऊस पडला,’ अशी माहिती केआयटीच्या पर्यावरण अभियांत्रिकी विभागाचे प्रा. सौरभ जोशी यांनी ‘सकाळ’ला दिली.

ते म्हणाले, ‘‘अमेरिकेला इर्मा आणि कॅरेबियन बेटाला हार्वे चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. ताशी पाचशे ते सातशे किलोमीटर वेगाने वारे वाहत होते. त्या वादळाचाही परिणाम कालच्या पावसावर  झाला. ग्लोबल रेन इम्पॅक्‍टचाच हा परिणाम आहे. अलीकडे वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण वाढले आहे. खरे म्हणजे हा परतीचा पाऊस आहे; मात्र वातावरणातील बदलामुळे ढगांच्या जाडीत वाढ झाली आहे. याला ‘ओरोग्राफिंग लिफ्टिंग’ असे म्हणतात. ढगांचा बॉटम शेप प्लेन असतो, त्या वेळी उच्च दाब निर्माण होतो. या काळात ढगांची हालचाल होत नाही, ते एकाच जागेवर थांबून राहतात. ढगांचे आकारमान आणि वस्तुमानात वाढ झाली आहे. एरव्ही हवेचा वेग चार ते सहा मीटर प्रति सेकंद इतका होता. पावसावेळी हा वेग ११ ते १३ प्रतिसेकंद इतका असतो. अशा प्रकारच्या पावसाला वाढते औद्योगिकीकरण आणि हवेचे प्रदूषण कारणीभूत आहे. वातावरणात कधी नाही एवढा विचित्र बदल झाल्यामुळे यापुढील काळातही असाच अचानक पाऊस कोसळत राहील. पावसाळ्यासह हिवाळा, उन्हाळा असा कोणताही ऋतू चार महिन्यांचा राहिलेला नाही. कधीही ऊन पडेल, कधीही थंडी पडेल; तर कधी पाऊसही पडू शकतो. निसर्गाचा क्रम प्रदूषणामुळे बदलून गेला आहे. नैसर्गिक स्रोत अडविणे हे कारणही पावसास कारणीभूत आहे.’’