संकेश्‍वरी मिरचीस प्रतिकिलो ६०० ते ७०० दर

संकेश्‍वरी मिरचीस प्रतिकिलो ६०० ते ७०० दर

कोल्हापूर - उन्हाचा चटका अलीकडे प्रकर्षाने जाणवत असून, घरोघरी वर्षभराची चटणी करण्याचे नियोजन सुरू आहे. 
एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून मेमध्ये वळीव पाऊस, ढगाळ वातावरण, जोरदार वारे वाहने आदी घटकांमुळे चटणी केली जात नाही.

मार्चमध्ये चटणी करून ठेवण्याचे प्रमाण कोल्हापुरात जास्त आहे. यासाठी मार्चमध्ये ग्राहकांकडून मिरची खरेदीला प्राधान्य दिले जाते. संकेश्‍वरी मिरचीचा दर मात्र यंदा ६०० ते ७०० रुपये प्रतिकिलो झाला आहे. तिखटपणा, वास, रंग चटणीला येत असल्याने संकेश्‍वरी मिरचीला काही झाले तरी ग्राहकांची प्रथम पसंती असते.

कोल्हापुरातून मिरची कोकणातील बाजारपेठेत जाते. कर्नाटक, आंध्र प्रदेश, गडहिंग्लज भागांत यंदा तुलनेने मिरची लागवड कमी, पावसात चढ-उतार, उसाचे वाढलेले क्षेत्र आदी घटकांचा परिणाम झाला आहे.
 
- सूरज खंडेराव हळदे,
मिरची व्यापारी. 

सर्वसाधारणपणे जानेवारी ते मे कालावधीत घरगुती चटणी करून ठेवण्यासाठी मिरची खरेदी केली जाते. फेब्रुवारीदरम्यान कोल्हापूरच्या बाजारपेठेत मिरचीची आवक जास्त प्रमाणात होते. यावर्षी मात्र मिरचीची आवक तुलनेने कमी आहे. मागील वर्षीपर्यंत रोज लक्ष्मीपुरी बाजारात बाहेरून तीन ते चार ट्रक मिरच्यांची आवक होत असे. एका ट्रकमध्ये आठ टन मिरची माल असतो. यंदा मात्र चार दिवसांतून एक ट्रक येत आहे.

मिरचीचा प्रकार अन्‌ दर (प्रतिकिलो रुपये) 

  •  ब्याडगी :     १८० ते २५०

  •  लवंगी :     १३० ते १७०

  •  रॅलीज साधी जवारी :     १३० ते १७०

  •  संकेश्‍वरी :     ६०० ते ७००

  •  काश्‍मिरी :     २५० ते ३००

  •  गुंटूर :     १०० ते १४०

  •  काश्‍मिरी ब्याडगी :     २५० ते ३००

विशेष म्हणजे, हॉटेलमध्ये डाळ तडका करण्यासाठी काश्‍मिरी ब्याडगी मिरचीची खरेदी मोठ्या हॉटेल्सकडून होते. त्यातही ब्याडगी मिरचीत प्युअर कर्नाटकी, हैदराबादी असे दोन प्रकार आहेत. ब्याडगी मिरचीची चव ही उत्कृष्ट आहे. शरीराला ती अपायकारक नसल्याने अनेक ग्राहक चटणीसाठी ही मिरची 
आवर्जून वापरतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com