उलगडणार महाराष्ट्र फिल्म कंपनीचा प्रवास...! 

उलगडणार महाराष्ट्र फिल्म कंपनीचा प्रवास...! 

कोल्हापूर - महाराष्ट्र फिल्म कंपनी आणि कोल्हापूर चित्रपट व्यवसायाची यंदा शंभरी. त्यानिमित्ताने सहाव्या कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महाराष्ट्र फिल्म कंपनी आणि कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्याविषयीच्या दुर्मीळ छायाचित्रांचे प्रदर्शन अनुभवायला मिळणार आहे.

यातील काही छायाचित्रे अशी आहेत की, त्याचे संदर्भही अजून सापडत नाहीत. दरम्यान, केवळ कोल्हापुरातच नव्हे तर जगभरातील अभ्यासकांकडून बाबूराव पेंटर यांच्या चित्रपटविषयक कामाचा अभ्यास होऊ लागला आहे. फ्रान्स, पॅरिस, लंडन आणि जेरूसलेम आदी ठिकाणच्या अभ्यासकांनी कोल्हापुरात भेट देऊन त्यांच्या विषयीची संपूर्ण माहिती घेतली असून विशेषतः पॅरिस युनिव्हर्सिटीतील विद्यार्थ्यांनी त्यांच्यावर सर्वांगीण अभ्यास सुरू केला आहे. 

कुठल्याही कलासक्त, कलाभक्ताने कोल्हापुरात यावे आणि खरी कॉर्नर येथील स्टुडिओला त्याचे पाय न लागावेत, यासारखे दुसरे नवल नसावे. कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या या स्टुडिओला आजही देशभरातील दिग्गज आवर्जून सलाम करतात. येथे त्यांनी एका कुपीच्या साहाय्याने भव्य कलाकृती साकारण्यासाठी उभारलेली यंत्रणा हासुद्धा वेगळ्या अभ्यासाचाच विषय. त्यांच्याच नावाने सुरू असलेल्या फिल्म सोसायटीच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सुरू झाला आणि यंदा त्याचे सहावे वर्ष आहे. सहा वर्षांत "किफ' फिल्म फेस्टिव्हल जगाच्या नकाशावर ठळकपणे पोचला असल्याचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी सांगतात. 

पेंटर दृष्टिक्षेपात 

  • बाबूराव पेंटर म्हणजे रंगकुंचल्यांतून सृष्टीतील सौंदर्य कागदावर साकारणारे चित्रकार 

  • मातीला आकार देऊन दगडाला देवपण आणणारे शिल्पकार 

  • आपल्या कल्पकतेतून यंत्रे बनविणारे यंत्रविशारद 

  • वयाच्या सतराव्या वर्षीच त्यांच्या कल्पकतेतून पाण्यावर चालणारी सायकल निर्माण झाली. 

  • लहान प्रोजेक्‍टर मशीनपासून भारतीय बनावटीच्या पहिल्या चलचित्र कॅमेऱ्याची निर्मिती 

  • मूकपटांतील प्रसंग प्रभावी वाटावे, यासाठी पडद्यासमोर पियानो वाजविण्याची कल्पनाही त्यांचीच 

  • आउटडोअर चित्रीकरणासाठी रिफ्लेक्‍टर वापरून प्रकाशयोजना, पन्हाळगडावर झालेले भारतातील पहिले ऐतिहासिक बाह्यचित्रणही त्यांनीच केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com