महापौर हसीना फरास देणार बाराला राजीनामा

महापौर हसीना फरास देणार बाराला राजीनामा

कोल्हापूर - महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा १२ ला बोलाविण्यात आली आहे. त्यात महापौर हसीना फरास पदाचा राजीनामा देणार असल्याचे काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी आज सांगितले.

महापौर निवड २० पर्यंत
महापौरांनी राजीनामा दिल्यानंतर आठवडाभरात म्हणजे २० डिसेंबरपर्यंत नव्या महापौरांची निवड होईल. आता हे पद काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. काँग्रेसकडून माजी महापौर (कै.) दिलीप मगदूम यांच्या पत्नी दीपा, उमा बनछोडे आणि स्वाती यवलुजे इच्छुक आहेत. नव्या महापौरांना पाच महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. दक्षिण मतदारसंघात पद देण्याचा निर्णय झाल्यास दीपा मगदूम यांचा विचार होऊ शकतो. उत्तरेकडे द्यायचे झाल्यास यवलुजे किंवा बनछोडे यांच्यात चुरस असेल.

ऑक्‍टोबर २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक २९ जागा काँग्रेसला मिळाल्या. राष्ट्रवादीला १५ जागा मिळाल्या. दोन्ही काँग्रेस एकत्र येत सत्ता स्थापन केली. पहिल्यांदा महापौरपद काँग्रेसच्या अश्‍विनी रामाणे यांना वर्षासाठी मिळाले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या हसीना फरास यांची निवड झाली.

त्यांचीही वर्षाची मुदत पूर्ण झाली आहे. या काळात त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला. तत्कालीन आयुक्त पी. शिवशंकर विरुद्ध सभागृह असा संघर्ष अनेकदा निर्माण होत असताना फरास यांनी सामंजस्याची भूमिका घेत संघर्ष निवळण्याचा प्रयत्न केला. शाहू समाधीस्थळाचे काम त्यांच्याच कारकिर्दीत पूर्णत्वाच्या दिशेने सुरू आहे. महापौर केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजनही त्यांनी केले आहे. वर्षभरात त्यांनी कामकाजातून आपला ठसा उमटविला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com