इचलकरंजीत मोबाईल चोरणारी टोळी ताब्यात

राजेंद्र होळकर
बुधवार, 23 मे 2018

इचलकरंजी - येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकांने मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या इचलकरंजीमधील तिघांच्या टोळीला पकडले. तिघामध्ये दोन अल्पवयीन तरुणाचा समावेश आहे. त्याच्याकडून हजारो रुपयांचे किंमती मोबाईल करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसापासून शहर आणि परिसरामध्ये धुम स्टाईलने मोटरसायकलवरुन येवून मोबाईलधारकांच्या हातातील मोबाईल पळवून नेण्याच्या घटनामध्ये वाढ झाली होती. यांची दखल घेवून पोलिसांनी शहरामध्ये अनेक ठिकाणी साध्या वेषामध्ये राहून करडीनजर ठेवली होती. याचदरम्यान येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकांचे पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे, कॉन्स्टेबल विकास कुरणे, हणमंतराव माळी, अनिल पाटील, पाथरवट आदीच्या पथकाला मोबाईल स्नॅचिंग करणाऱ्या तिघाच्या टोळीला पकडण्यास यश आले. त्यांनी दहाहून अधिक किंमती मोबाईल हिसडा मारुन पळवून नेल्याची पोलिसांनी माहिती दिली असून, पोलिसांनी त्यांच्याकडून आतापर्यत सहा मोबाईल जप्त केले आहेत. 

Web Title: Kolhapur News mobile snatching thief arrested